- अमृता कदमगुलाबी थंडीत मस्त धुक्यात नटलेल्या हिरवाईचं आणि डोंगररांगांचं दर्शन घ्यायचं असेल तर यासारखी दुसरी उत्तम वेळ नाही. अनेकांना अशा वातावरणात ट्रेकिंग, लाँग ड्राइव्ह, किंवा बाइकिंग करायला आवडतं. पण यापेक्षा वेगळा काही पर्यायही तुमच्याकडे आहे. उंच आकाशातून तरंगणा-या ढगांचं दर्शन घेत अप्रतिम अशा सूर्यास्ताचं रु प डोळ्यात साठवण्यासाठी रोप-वे तून एकदा तरी सफर करायला हवी. थंड हवेचं ठिकाण मस्त एक्स्प्लोअर करण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे रोप वे. यासाठी आपल्या देशातील चार रोपवे उत्तम आहेत.
दार्जिलिंग
दार्जिलिंगचा रोप-वे 1968 साली वनखात्यानं सुरु केला आहे. या शहराभोवती पसरलेलं अफाट निसर्गसौंदर्य पाहण्याची संधी या रोप-वेमुळे मिळते. घनदाट जंगलं, अरूंद द-या, चहाचे मळे, धबधबा आणि नदी हे सगळं ओलांडत जाणारा हा रोप वे कदाचित हिमालयाच्या कुशीतला एकमेव असा अनुभव ठरावा. या रोपवे शिवाय इथे तुम्हाला दार्जिलिंंग हिमालयन रेल्वे, पीस पॅगोडा, टायगर हिल, घूमचा बौद्ध मठ आणि वस्तूसंग्रहालय या गोष्टीही पाहण्यासारख्या आहेत. गुलमर्ग 2008 मध्ये सुरु झालेली ही रोप वे सेवा भारतातलीच नव्हे तर आशियातली सर्वात उंचावरची कारसेवा मानली जाते. जगात तिचा दुसरा क्रमांक आहे. काश्मीरचं सौंदर्य अशा उंचीवरु न पाहणं हा केवळ थक्क करणारा अनुभव आहे. ही रोप-वे दोन टप्प्यात चालते. दुसरा टप्पा हा बर्फाच्छादित भागातून जाणारा आहे. ‘धरतीवरचा स्वर्ग’ असं काश्मीरचं वर्णन का करतात ते कदाचित या रोप वेच्या या सफरीतून दिसणा-या दृश्यांवरून अधिक चांगलं समजू शकेल. गुलमर्ग शिवाय दल सरोवर, सोनमर्ग, शालिमार बाग, पहलगाम ही इतर पर्यनटस्थळंही जवळच आहेत.
रायगड
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाबद्दल मराठी माणसाला अधिक सांगण्याची खरंतर गरज नाही. छत्रपती शिवरायांच्या नावाचा गजर करत अनेकजण रायगडचा ट्रेक करणं पसंत करतात. पण इथल्या द-याखो-याचं सौंदर्य अनुभवण्यासाठी एकदा रोप वेचीही सफर करायला हरकत नाही. शिवाय हा रोप वे ‘ना नफा ना तोटा’ या तत्वानुसार चालत असल्यानं तुमच्या खिशालाही फार भार पडत नाही. रायगडमध्ये गंगासागर तलाव, ताम्हिणी धबधबा, वर्सोली बीच ही इतर पर्यटनस्थळंही अनुभवता येतात.
मसुरी
उत्तराखंडच्या देहरादून जिल्ह्यात वसलेलं मसुरी हे ‘क्वीन आॅफ हिल्स’ म्हणून ओळखलं जातं. ‘गन हिल’ हे उंचीनुसार मसुरीतलं दुस-या क्र मांकाचं स्थळ आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून 2024 मीटर अंतर इतकी आहे. या ठिकाणी पोहचण्यासाठी तुम्हाला जवळपास अर्धा किमी अंतराचा रोप वे उपलब्ध आहे. मसुरीचं सौंदर्य ख-या अर्थानं अनुभवयाचं असेल तर या गन हिल पॉइंटसारखं दुसरं स्थळ नाही. केम्प्टी धबधबा, मसुरी तलाव, लाल तिब्बा आनि कंपनी बाग ही इतर पर्यटनस्थळंही इथे आहेत.
सोलांग व्हॅली
सोलांग व्हॅली हे मनालीतलं सर्वात उत्तम पर्यटनस्थळ आहे. बर्फाच्छादित डोंगर आणि तितकीच गर्द हिरवळ यांची सुंदर नक्षी पाहायची असेल तर सोलांग व्हॅलीसारखं ठिकाण नाही. इथे आल्यावर पर्यटकांना स्किर्इंग, स्नो बोर्डिंग, पॅराग्लायिडंग, हायिकंग, घोडेस्वारी अशा इतर धाडसी खेळांचीही मजा अनुभवायला मिळते. माऊंट फथ्रू या 3200 मी उंचावर वसलेल्या ठिकाणी नेणारी थ्रिलिंग अशी ‘रोप वे’ ची सफर मनालीच्या सफरीतला सर्वोत्तम अनुभव ठरु शकते. जमिनीवरु न तर आपण नेहमीच सफर करतो. पण ना जमिनीवर ना आकाशात अशा प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर या ठिकाणांना आवर्जून भेट द्या.