गोवा म्हणजे सर्वच पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय. फक्त देशांतीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकही वर्षभर येथे येत असतात. सुमुद्र किनाऱ्यांव्यतिरिक्त येथील निसर्गसौंदर्यही नेहमीच पर्यटकांना भूरळ घालत असतात. तुम्ही देखील गोव्याला जाऊन तेथील निसर्गसौंदर्य अनुभवण्याचा विचार करत असाल तर येथील सलीम अली पक्षी अभयारण्याला भेट द्यायला विसरू नका. या पक्षी अभयारण्यामध्ये विविध प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतील.
चराओ आयर्लंडवर वसलेलं पक्षी अभयारण्य
सलीम अली पक्षी अभयारण्य गोव्याची राजधानी असलेल्या पणजीपासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे. मांडवी नदीच्या मध्यावर असलेल्या चराओ आयर्लंडव हे अभयारण्या वसलेलं आहे. तसेच या बेटाबाबत अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. अनेकांचं असं म्हणणं आहे की, या बेटाची उत्पत्ती श्रीकृष्णाची आई यशोदाने हिरे फेकल्यामुळे झाली होती.
नोव्हेंबर ते फेब्रुवारीचा काळ फिरण्यासाठी उत्तम
पक्ष्यांच्या अनेक प्रजाती एकत्र पाहण्याची इच्छा असेल तर या ठिकाणी जाण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारीचा काळ उत्तम असतो. या दिवसांमध्ये हजारो पर्यटक पक्षी पाहण्यासाठी या अभयारण्यात येत असतात.
पक्षी अभयारण्यात विविध आणि दुर्मिळ प्रजाती :
लिटिल बिटर्न पक्षी
अभयारण्यातील सर्वात सुंदर पक्ष्यांपैकी एक म्हणजे लिटिल बिटर्न पक्षी. मूळचा अमेरिकेतील असलेल्या या पक्ष्याचा आवाज वाघासारखा असतो. याच्या या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यामुळेच हा लोकांचा आवडता पक्षी बनला आहे.
ब्रह्मिनी चील
चील प्रजातीचा हा पक्षी पाण्याजवळ राहणं पसंतर करतो. आपलं पोट भरण्यासाठी हा मासे आणि बेडकांवर अवलंबून असतो.
स्टॉर्क बिल किंगफिशर
हा पक्षी पाण्याच्या किनाऱ्यावर आणि घनदाट जंगलामध्ये राहणं पसंत करतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे, या प्रजातीचे पक्षी एकत्र राहणं पसंत करतात. हे पक्षी एका दिवसात 16 मासे खाणं पसंत करतात.
पर्पल सनबर्ड
फळां-फुलांचा रस पिणारा हा पक्षी छोटा सनबर्ड म्हणून ओळखला जातो. फुलांचा रस पिताना हा पक्षी फार सुंदर दिसतो.