भारत हा परंपरा आणि विविधतेने नटलेला देश आहे. येथे अनेक लोकं देवावर श्रद्धा ठेवतात त्याचप्रमाणे काही लोकं निसर्गावरही प्रेम करतात. निसर्गातील झाडं, प्राणी यांना ते देव मानतात. यांपैकी अनेक ठिकाणी प्राण्यांची पूजा करण्यात येते. आज आपण जाणून घेऊयात अशा एका ठिकाणाबाबत जे आपल्या सौंदर्यासोबतच तेथील परंपरा आणि प्रथांसाठीही ओळखले जातं. हे ठिकाण भारतातीलगुजरात राज्यामध्ये स्थित असून तेथील हिल्स स्टेशनपैकी एक आहे. सापुतारा हिल्स हे गुजरातमधील असं ठिकाण आहे. जिथे नागाला देव मानल जातं. दरवर्षी लाखो पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात.
अनेकदा फिरण्यासाठी हिल्स स्टेशन्सला प्राधान्य देण्यात येतं. त्यातल्या त्यात मनाली, मुन्नार, शिमला आणि मसूरी यांसारख्या ठिकाणांची निवड करण्यात येते. पण याव्यतिरिक्तही अनेक हिल स्टेशन आहेत जे आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जातात. यांपैकी एक म्हणजे सापुतारा हिल्स. सापुताराचा अर्थ आहे नागांचं निवास स्थान. सापुताराच्या जंगलामध्ये अनेक प्रकारचे नाग आढळून येतात. त्यांना पाहायला अनेक पर्यटक आणि सर्पमित्र सापुताराला भेट देतात. येथील सर्पगंगा नदीच्या किनाऱ्यावर एक मोठी सापाची प्रतिमा तयार करण्यात आली आहे.
मान्सूनमध्ये सापुताराचं सौंदर्य आणखी बहरतं. येथे होणाऱ्या पावसामुळे सापुताराच्या सौंदर्यात भर पडते. यावर्षीही हे फेस्टिव्हल 4 ऑगस्टपासून सुरू झालं असून ते 3 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये तुम्ही गीत-संगीत, लोककला आणि अॅडव्हेंचर अॅक्टिव्हीटीचा आनंद घेऊ शकता.
निसर्ग आणि हिरवळ यांमध्ये तुमचं मन रमत असले तर सापुतारा तुमच्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे. डांग वनमध्ये असेलेल्या सापुतारामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये 90 टक्के लोकं ही आदिवासी आहेत.
संपूर्ण सापुताराच निसर्गसौंदर्याने नटलेलं आहे. पण येथे असलेला सापुतारा तलाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. येथे येऊन तुम्ही तुमचं सर्व टेंशन विसरून जाल. सापुतारा तलावाच्या शांत निळ्याशार पाण्यामध्ये बोटींगचाही आनंद घेऊ शकता.
सापुताराच्या जीवनशैलीला उजाळा देईल सापुतारा म्युझियम
सापुतारा म्युझियम येथील जीवनशैली आणि त्याबातची माहीती जाणून घेण्यासाठी तुम्हाला मदत करेल. हे म्युझियम पर्यटकांना नृत्य, वेशभूषा, परिस्थिती आणि त्यांची जीवनशैली याबाबत सविस्त माहीती देते.