आपल्या देशाचे चलन जगभरात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत मोजले जाते. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमुल्यन झाले की त्य़ाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसतो. यामुळे ज्या देशांच्या चलनाचा डॉलरच्या तुलनेत दर वधारलेला असतो ते देश आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत वाटतात. यामुळे तिथे फिरायला जायचे असले तर आपल्याला खिसा रिकामा करावा लागतो. परंतू जगात असेही काही देश आहेत जिथे भारतीय रुपयाला एवढी व्हॅल्यू आहे की तुम्हाला तिथे श्रीमंतच नाही तर अतिश्रीमंत असल्यासारखे वाटेल. चला पाहूया असे काही देश जे आपल्याला श्रीमंतीचा फील देतात. (some of these countries have currencies cheaper than INR, good destination for travel.)
कंबोडियाकंबोडिया हा असा देश आहे जिथे हिंदू संस्कृती नांदत होती. इथे युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता दिलेले भगवान विष्णूचे सर्वात मोठे अंगकोरवाट मंदिर आहे. कंबोडियाचे चलन भारतीय रुपयाच्या तुलनेत खूप कमी आहे. यामुळे इथे जाण्याचा प्लॅन असल्यास तुमच्या खिशालादेखील फटका बसणार नाही. येथे Siem Reap शहरालाही भेट द्यावी. येथील नाईट लाईफ आणि मार्केटमध्ये बार्गेन करण्यास वाव आहे. तसेच येथील समुद्रकिनारेदेखील विलोभनीय आहेत. सध्या इथे भारतीय रुपयामागे 54.70 रियाल मोजावे लागतात.
झिम्बाब्बेझिम्बाब्वेचे अधिकृत चलन अमेरिकन डॉलर्स असले तरी देशातील विचित्र चलनवाढीच्या दरांमुळे पर्यटकांसाठी अन्न आणि स्थानिक पर्यटन यासारख्या गोष्टी फारच स्वस्त झाल्या आहेत. यामुळे भारतीय रुपया तेथे खूप भाव खातो. राजधानी हरारे, शॉपिंग आणि नाईटलाइफ देखील छान आहे. झिम्बाब्वेच्या व्हिक्टोरिया फॉल्स, मना पूल किंवा ह्वांगे यासारख्या अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. सिंह, बिबट्या, हत्ती आणि विविध पक्षी यांच्यासमवेत जवळून वेळ घालवता येतो. महत्वाचे म्हणजे इथे य़ेण्यासाठी काहीसा महागडा प्रवास करावा लागेल परंतू आल्यावर सारे स्वस्तच स्वस्त आहे.
पॅराग्वेग्वारानी संस्कृती, सॉकर आणि स्वादिष्ट दक्षिण अमेरिकन खाद्यपदारर्थ इथे स्वस्त दरांत अनुभवता येतात. या देशाची राजधानी Asuncion म्हणजे जुन्या जगाचे प्रतिबिंबच. युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ असलेल्या त्रिनिदाद आणि जिझसच्या प्रसिद्ध जेसूट रिडसीओन्सला भेट देता येईल. भारतातून पॅराग्वेला जाण्याचा विमान प्रवास १००००० लाखात होतो परंतू आधी बुकिंग केल्यास कमी दरात तिकिटे मिळू शकतात. भारतीय रुपयाला 88.05 ग्वारानी एवढी किंमत आहे.
लाओसलाओसमध्ये अप्रतिम बुद्धीस्ट मंदिर आहे. जुनी राजधानी लुआंग प्रबंग ही देखील पाहण्यासारखी आहे. हे देखील एक युनेस्कोने जाहीर केलेले वारसास्थळ आहे. वन्यप्राणी, जंगले आदींनी वेढलेला देश आहे. यादेशाचे चलन भारतीय रुपयाच्या तुलनेत 127.17 LAK एवढे आहे.
कोलंबिया हा देश दक्षिण अमेरिकेत जरी असला तरीही तिथे स्थानिक चलनाच्या तुलनेत भारताहून स्वस्त आहे. अॅमेझोनियन जंगले अँडीजच्या मध्यभागी असलेल्या बोगोटाची राजधानी ला कॅंडेलेरिया हे सांस्कृतिक केंद्र आहे. व्हर्जिन कॅरिबियन किनारे अप्रतिम. कोलंबियन कॉफिचा स्वाद खूप प्रसिद्ध आहे. 1.5 तासांच्या अंतरावर असलेल्या फुसागासुगा कॉफीच्या मळ्यांनाही भेट देता येते. इथे एका रुपयाला सध्या 50.13 कोलंबियन पेसो एवढी किंमत आहे.
श्रीलंकाश्रीलंका हा भारताच्या अगदी जवळचा देश आहे. यामुळे बरेचशे भारतीय तिथे फिरण्यासाठी जात असतात. पेट्टाचा बाजार आणि श्रीलंकेच्या दुसऱ्या भागातील उप्पूवेली आणि निलावेली ही समुद्रतटावरील छोटी शहरे जी जास्त प्रकाशात नाहीत तिथे जाता येईल. चहाचे मळे असलेले नुवारा इलिया हे शहर देखील पाहण्यासारखे आहे. एका भारतीय रुपयाला इथे 2.66 श्रीलंकन रुपये एवढी किंमत आहे. महत्वाचे म्हणजे इथे विकतचे पाणी खूप महाग आहे.
सातवा देश म्हणजे इंडोनेशिया...भारतीयांना श्रीमंत बनविणारा सातवा देषश म्हणजे इंडोनेशिया. वालुकामय झालेले समुद्रकिनारे, हिरवीगार शेते, पुरातन मंदिरे आणि त्यांची स्थापत्यकला पाहण्याजोगी आहे. इथे जिवंत ज्वालामुखीदेखील आहेत. जागतीक दर्जाचे वॉटर स्पोर्टस देखील एकाच देशात पहायला मिळतात. हा देश म्हणजे एक व्हॅल्यू फॉर मनी असाच आहे. आणि हो बालीचे नाव ऐकलेच असेल, कोपी लुवाक, योग्यकार्टा, गिली आईसलँड अशी अनेक ठिकाणे इथे पाहण्यासारखी आहेत. इथे तुम्ही गेला की लगेचच लखपती, करोडपती होऊन जाता. कारण भारतीय रुपयाला इथे 195.08 इंडोनेशिअन रुपये एवढी मोठी किंमत आहे.