- अमृता कदम वॉलपेपरसारखी भासणारी सुंदर पार्श्वभूमी, आकर्षक लॅण्डस्केप्स आणि प्रेमात आकंठ बुडालेलं जोडपं. व्हायरल होणार्या इन्स्टाग्राम ट्रॅव्हल अकाउण्टसाठी एकदम योग्य असा मेळ. हे समीकरण सगळ्यांत पहिल्यांदा 2014 मध्ये मुराद आणि नताली ओस्मान या रशियन फोटोग्राफर-मॉडेल जोडप्याला गवसलं.
त्यांनी ‘फॉलो मी टू’ नार्या वानं इन्स्टाग्राम अकाउण्ट सुरु केलं. त्या दोघांच्या फिरण्याच्या वेडाचं आणि एकत्र केलेल्या प्रवासाच्या क्षणांचे फोटो सर्वांसोबत शेअर करणं हा त्या मागचा त्यांचा उद्देश होता. अल्पावधीतच 5 लाख फॉलोअर्स मिळवणार्या followmeto नं सोशल मीडियामध्ये एक ट्रॅव्हल फोटोंचा नवा ट्रेण्ड सेट केला.
त्यानंतर त्यांची नक्कल करणार्या अशा ट्रॅव्हल फोटोंचं पीकच इन्स्टाग्रामवर आलं. पण जी लोकप्रियता आणि दाद मुराद आणि नतालींच्या फोटोंना मिळत होती, त्याची बरोबरी करणं कोणालाच जमलं नाही.
मुराद आणि नताली ओस्मानच्या फोटोंना पहिल्यांदा खर्या अर्थानं स्पर्धा दिली ती व्हिक्टोरिया योर आणि टेरेन्स ड्रिस्डेल या अमेरिकन जोडप्यानं. फिरण्याचं भन्नाट वेड असलेल्या या जोडप्यानं निसर्गदृश्यांच्या अद्भुत सुंदर फोटोंबरोबरच त्यांच्या प्रवासाबद्दलची वस्तुनिष्ठ माहितीही शेअर केली.या जोडीच्याfollowmeaway इन्स्टाग्राम अकाउण्टवर जवळपास 50 हजार फॉलोअर्स आहेत. आपल्या फॉलोअर्ससाठी ते एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर तुम्ही कोणत्या ठिकाणांना भेटी द्याव्यात, खाण्यासाठीची प्रसिद्ध ठिकाणं, राहण्यासाठीच्या जागा आणि इतर गोष्टीही सांगतात. त्यांचे हे ट्रॅव्हललॉगही तितकेच लोकप्रिय आहेत. तुम्हाला जर व्हिक्टोरिया आणि टेरेन्सच्या प्रवासातला रोमांच अनुभवायचा असेल तर तुम्ही त्यांच्या अकाउण्टला भेट देऊन त्यांनी नुकत्याच केलेल्या पेरु ट्रीपचे फोटो पाहू शकता. हे फोटो पाहिल्यानंतर आपली बॅग पॅक करून प्रवासाला निघण्याचा मोह तुम्हालाही आवरणार नाही.
अॅडव्हेंचर, रोमान्स आणि वेगळेपणाची आवड असणार्या अनेक जोडप्यांचे इन्स्टाग्राम अकाऊण्ट त्यांच्या प्रवासाची कहाणी सांगतील. त्यांचे फोटो नताली-मुराद किंवा व्हिक्टोरिया आणि टेरेन्सच्या फोटोंइतके सुंदर नसतीलही कदाचित पण तुम्हाला फिरण्याची प्रेरणा देण्यासाठी नक्कीच पुरेसे आहेत.तुम्हालाही फिरताना काही नवीन करायची आवड असेल तर तुमचे प्रवासाचे अनुभव शेअर करण्यासाठी इन्स्टाग्राम ट्रॅव्हल अकाउण्टचा प्रयोग तुम्ही करु शकता. आणि त्यासाठी तुम्हाला थोडंसं उत्तेजन हवं असेल तर व्हिक्टोरिया-टेरेन्सच्या फोटोची ही झलक आवर्जून पाहा.