(Image Credit : www.atlasandboots.com)
भारताचा शेजारी देश श्रीलंका फिरण्यासाठी सर्वात चांगल्या ठिकाणांपैकी एक आहे. येथील सर्वात खास स्पॉट आहे सिगरिया रॉक. हा पाचव्या शतकात तयार करण्यात आला होता आणि याला लोक जगातलं आठवं आश्चर्य मानतात. हे श्रीलंकेतील सर्वात जास्त बघितलं जाणारं पर्यटन स्थळ आहे. जर तुम्हालाही ऐतिहासिक ठिकाणांना भेट देण्याची आवड असेल तर या ठिकाणाला तुम्ही आवर्जून भेट द्यावी.
तिसऱ्या शतकात हे ठिकाण मठांसाठी ओळखलं जायचं
ऐतिहासिक महत्त्वामुळे हे ठिकाण बघण्यासाठी जगभरातील पर्यटक येतात. इथे एक मोठा डोंगर ज्वालामुखीतून निघालेल्या लाव्हारसाने तयार झाला आहे. येथील नजारे निसर्ग आणि मनुष्य यांच्यातील एक अनोखं संबंध दाखवतात. तीसऱ्या शतकापासून हे ठिकाण मठांसाठी ओळखलं जातं. इथे बाग, तवाल सुद्धा आहेत. तसेच येथील प्राचीन किल्ले आणि महालही बघण्यासारखे आहेत.
सिगरिया म्हणजे लॉयन रॉक
(Image Credit : Backpacker Banter)
राजा कश्यपने ५ व्या शतकात इथे रॉयल महाल बनवण्याचा निर्णय घेतला होता. पण राजाच्या मृत्युनंतर या ठिकाणाने १४ व्या शतकापर्यंत बौद्ध मठाच्या रूपात प्रसिद्धी मिळवली. याचं प्रवेशद्वार डोंगराच्या उत्तर भागात आहे. हा डोंगर सिंहासारखा दिसेल असं डिझाइन करण्यात आलं आहे. या दगडाचा खालचा भाग तसाच आहे, पण वरचा भाग तोडण्यात आला आहे.
मिरर वॉल आणि चित्रांचा दगड
(Image Credit : David's Been Here)
सिगरियाच्या पश्चिमेकडील भींती चित्रांनी झाकलेल्या होत्या. हे चित्र कश्यपच्या शासनकाळात तयार करण्यात आली होती. यातील १८ चित्रे आजही बघितले जाऊ शकता. यात महिला सौंदर्याचे विषय आहेत. सिगरियाची सर्वात मोठी खासियत म्हणजे येथील मिरर वॉल आहे. प्राचीन काळापासून याची काळजी घेतली जात होती. मिरर वॉलवर सिगरियामध्ये येणाऱ्या लोकांसाठी लिहिलेले शिलालेख आणि कविता चित्रित केल्या आहेत. शिलालेखातून अशी माहिती मिळते की, सिगरिया एक हजार वर्षांआधीही एक पर्यटन स्थळ होतं.