दिल्लीच्या यमुना नदीवर तयार करण्यात आलेला सिग्नेचर ब्रिज सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे. हा ब्रिज नुकताच सर्वसामान्य जनतेसाठी खुला झाला आहे. हा ब्रिज वाहतूकीसाठी तर असेलच सोबतच पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. कारण या ब्रिजची उंची कुतुब मीनारच्या दुप्पट करण्यात आली आहे. कुतुब मिनारची उंची ही ७३ मीटर आहे तर सिग्नेचर ब्रिजची उंची १५४ मीटर आहे. जे लोक इंडिया गेट आणि कुतुब मिनार बघण्यासाठी दिल्ली जातात, ते आता हा ब्रिज बघूनही आनंदी होतील.
ब्रिजच्या टॉपवर जाण्यासाठी लिफ्ट
या सिग्नेचर ब्रिजमध्ये चार लिफ्ट लावण्यात येणार आहेत. एका लिफ्टमध्ये एकावेळी ५० पर्यटक ब्रिजच्या टॉपवर जाऊन नजारा बघू शकतात. लिफ्ट लावण्याचं काम दोन महिन्यात पूर्ण होणार आहे.
सेल्फी स्पॉट
ब्रिजच्या टॉपवर पर्यटकांसाठी एक सेल्फी स्पॉट सुद्धा तयार केला जाणार आहे. येथून तुम्हाला पूर्ण दिल्लीचा नजारा बघायला मिळणार आहे. कुतुब मीनारपेक्षा दुप्पट म्हणजेच १५४ मीटर उंच सिग्नेचर ब्रिज पॉईंटहून तुम्ही दिल्लीचा ३६० डिग्री व्ह्यू बघू शकाल.
ग्लास ऑब्जर्वेशन डेकवर येईल मजा
सिग्नेचर ब्रिजमध्ये ग्लास ऑब्जर्वेशन डेकचं काम सध्या सुरु असून काम पूर्ण होण्यासाठी ३ महिन्यांचा कालावधी लागेल. ग्लास बॉक्स लावलं जाणारं देशातील हे पहिलं पर्यटन स्थळ असेल. यातून दिल्ली शहराचं प्रत्येक साइडने दर्शन होणार आहे. इथे लोक सेल्फीही घेऊ शकणार आहेत.
ब्रिजची खासियत
या ब्रिजच्या डिझाइनमध्ये जागोजोगी क्लिअर ग्लासेस लावण्यात आले आहेत. त्यातून लोक फोटो काढू शकतात. फ्लोर हलक्या आणि मजबूत स्टीलने तयार केलं आहे. या डेकवर एकावेळी साधारण ५० लोक येऊ शकतात. या डेकला कवर करण्यासाठी वापरला जाणारा ग्लास ८६ किमी प्रति तासाच्या वेगाने येणारी हवा झेलू शकतो. जर या क्रॅक आला तरी हा पडणार नाही, कारण याला लॅमिनेट केलं आहे.
किती असेल तिकीट
आधी कुतुब मीनारवर जाण्याची मुभा पर्यटकांना देण्यात आली होती. पण आता ही सुविधा बंद केली आहे. सिग्नेचर ब्रिजवर जाण्याची मुभा पर्यटकांना असणार आहे. पण यासाठी पर्यटकांना किती पैसे मोजावे लागतील याची माहिती जाहीर केली नाहीये.