जर तुम्ही या उन्हाळ्यात सोलो ट्रिपला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही दक्षिण भारतातील हिल स्टेशन कुन्नूरला जाऊ शकता. इथे तुम्हाला रोमांचक अनुभवासोबतच निसर्गाच्या कुशीत मनालाही वेगळी शांतता मिळेल. कुन्नूरला तुम्ही काय काय बघू शकता याची माहिती आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.
नीलगिरी माउंटेन रेल्वे
तामिळनाडूमध्ये कुन्नूनर ते उटीदरम्यान चालणाऱ्या टॉय ट्रेनने प्रवास करणे एक वेगळाच अनुभव ठरेल. वाफेवर चालणारी ही ट्रेन डोंगरांच्या मधून जात असल्याने निसर्गाचं एक वेगळं रुप तुम्हाला बघायला मिळेल. आयुष्यभरासाठी तुम्ही हा अनुभव मनात साठवून ठेवू शकता.
डॉल्फिन्स नोज
नावावरुनच माहीत होतं की, हे ठिकाणा डॉल्फिनच्या नाकाच्या आकाराचं आहे. कुन्नुरच्या फेमस स्पॉटपैकी एक हे ठिकाण आहे. मुख्य शहरापासून केवळ १० किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणावर तुम्ही दाट जंगल, ग्रीनरी आणि डोंगराचे मनाला शांतता देणारे नजारे बघू शकता.
लेडी कॅनिंग्स सीट
या ठिकाणाहून तुम्ही नीलगिरीच्या डोंगराचं सौंदर्य बघू शकता. तसेच इथे चहाच्या मोठमोठ्या बागाही आहेत. शांतता आणि वेगळा अनुभव हवा असणाऱ्यांसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे.
राली बांध
ट्रेकिंगची आवड असेल तर तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. इथे बांधावर पोहोचण्यासाठी असलेला रस्ता हा जंगलातून जातो. याने तुम्ही जंगलांच सौंदर्य देखील बघू शकाल.
सिम्स पार्क
(Image Credit : Ooty Cottages)
कुन्नूरच्या प्रसिद्ध स्पॉटमध्ये सिम्स पार्कही आहे. हे एक बॉटनिकल गार्डन आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघू शकता. १२ एकर परिसरात असलेल्या या गार्डनमध्ये देशभरात आढळणारी गुलाबाची फुले तुम्ही बघू शकता. सकाळी ७ पासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे गार्डन सुरु असतं.