मार्च महिन्यातील वातावरण फारच वेगळं असतं कारण एकीकडे थंडी कमी झालेली असते आणि उन्हाळा सुरू होणार असतो. त्यामुळे हा कालावधी फिरायला जाण्यासाठीही चांगला मानला जातो. म्हणजे तुम्हाला थंडी त्रास होतो आणि ना उकाड्याचा. त्यामुळे तुम्हाला या वातावरणात एन्जॉय करायचं असेल तर फिरायची तयारी करा. आम्ही तुम्हाला मार्चमध्ये फिरण्यासाठी काही ठिकाणे सांगणार आहोत.
उटी, तामिळनाडू
तामिळनाडूमधील उटीमध्ये फिरण्यासाठी ही वेळ फार चांगली मानली जाते. सूर्याचा हलका प्रकाश तुमच्या प्रवासाला आणखीन फुलवणार. इथे येऊन तुम्ही डोडाबेटा पीक, टायगर हिल्ससारख्या ठिकाणांना भेट देऊ शकता. त्यासोबतच नीलगिरी माऊंटेन स्टेशन, ऐसराल्ड लेक सुद्धा फिरू शकता.
तवांग, अरूणाचल प्रदेश
मार्चमध्ये फिरण्यासाठी तवांग हे ठिकाणही चांगला पर्याय ठरेल. इथे येऊन तुम्ही तिबेट फेस्टिव्हल लोसरचाही आनंद घेऊ शकता. सोबतच माधुरी लेक, सेला पास आणि टीपी ऑर्किड सेंक्युरीमध्येही फिरू शकता. निसर्गाचा एक वेगळाच मनोहारी नजारा तुम्हाला इथे बघायला मिळू शकेल.
जेसलमेर, राजस्थान
मार्चमध्ये फिरायला जाण्यासाठी राजस्थानमधील जेसलमेर हे ठिकाणही चांगला पर्याय आहे. इथे तुम्ही वाळवंटात उंटाच्या सवारीचा आनंद घेऊ शकता. जुने किल्ले, राजवाडे, हवेली बघण्यातही एक वेगळीच मजा आहे. तसेच पाकिस्तानची बॉर्डरही बघू शकता. उन्हाळा सुरू झाल्यावर इथे जाणे म्हणजे महागात पडणारेच ठरेल.
शिलॉंग, मेघालय
मेघालयाची राजधानी शिलॉंग शहर सुद्धा या दिवसात फिरण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. ज्या लोकांना निसर्गाची आवड आहे त्यांनी इथे आवर्जून यावं. इथे तुम्ही खासी हिल्सला फिरू शकता. तसेच जंगलातून पायी फिरणे, ट्रॅकिंगसोबतच वेगवेगळ्या रोमांचक अॅक्टिविटीही करू शकता. मार्चमध्ये इथे पाऊसही फार कमी होतो.
हेवलॉक आयलॅंड, अंदमान-निकोबार द्वीप
निसर्गसोबतच तुम्हाला सुंदर समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही हेवलॉक आयलॅंडला जाऊ शकता. इथे तुम्ही वेगवेगळ्या अॅडव्हेंचरस अॅक्टिविटीही करू शकता.