हिवाळ्यात फिरायला जाण्यासाठी प्रत्येकजण नवीन ठिकाणाच्या शोधात असतो. जर तुम्हाला प्राण्यांवर बसून फेरफटका मारण्याची आवड असेल तर आज आम्ही तुम्हाला प्राण्यांच्या सफारीसाठी उत्तम असलेल्या काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. फेरफटका मारण्यासाठी भारतात अनेक प्राणी पर्यटन स्थळांवर उपलब्ध असतात. तसंच पर्यटकांना या प्राण्यांवरून फिरण्याची मजा सुद्धा घेता येते.
निसर्गाच्या सानिध्यात असताना तुम्ही जंगलातून आणि दुर्गम भागातून फेरफटका मारू शकता. हा फेरफटका मारत असताना कोणतेही वाहनं नाही तर चक्क प्राण्यावर बसून तुम्हाला हा फेरफटका मारता येणार आहे. चला तर मग कोणती आहेत आहेत अशी ठिकाणं जीथे तुम्ही प्राण्यांवर बसून फेरफटका मारू शकता. वाइल्ड लाइफ सेंक्चुरीज मध्ये घोडे आणि हत्तीचा वापर सफारीसाठी केला जातो. तसंच वाळवंटात फक्त उंट सफारीसाठी असतात.( हे पण वाचा-भूतानमध्ये कमीतकमी खर्चात सुट्टी इन्जॉय करण्याची संधी, IRCTC ने लॉन्ज केलय खास पॅकेज)
उंटाची सफारी
भारतात उंटाची सफारी जर तुम्हला करायची असेल तर एका ठिकाणी तुम्ही करू शकता. ते राज्य म्हणजे राजस्थान या ठिकाणी अमेरिका, युरोप या ठिकाणंचे लोकं मोठ्या संख्येने उंटावरून फेरफटका मारण्याचा आनंद घेतात. या ठिकाणी जाऊन तुम्ही वाळवंटतील जीवन जगू शकता. राजस्थानमध्ये जैसलमेर ते जोधपुर, जैसलमेर ते बीकानेर आणि जोधपुर ते बीकानेर उंटावरून फेटफटका मारण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. ( हे पण वाचा-श्रीलंकेला व्हिसाशिवाय फिरायला जाण्याची सुवर्णसंधी, कमी खर्चात घ्या पुरेपूर आनंद... )
घोड्याची सफारी
जर तुम्हाला पळण्याचे आणि धावण्याचे शौकिन असाल तर तुम्हाला घोड्यापेक्षा चांगला ऑप्शन असुच शकतं नाही. भारतात घोडे चालवण्याचे शौकिन असलेल्यांसाठी सुंदर पर्यटन स्थळ आहेत. कर्नाटकातील श्रीरंगपत्तन ते रामपुर, रंगनथिट्टू आणि बेलगोला वरून बालमुड़ी फॉल्स या ठिकाणी तुम्हाला घोड्याची सवारी करण्याचा आनंद घेता येईल. या ठिकाणी लांबलांबचे पर्यटक येत असतात. या व्यतिरीक्त मैसूर ते ललितादिर आणि उत्तनहल्ली या ठिकाणी तुम्ही फिरू शकता.
हत्तीवरून सफारी
हत्तीवरून प्रवास करण्यासारखे आरामदायक दुसरे काहीच नाही. जोशपुर्ण वातावरणात तुम्ही हत्तीवर बसून निसर्गाचे सौंदर्य पाहण्याचा आनंद घेऊ शकता. या सवारीचा सगळ्यात जास्त वावर हा अभयारण्य असलेल्या ठिकाणी केला जातो. हिमालयाच्या कुशीतले उत्तराखंडचे जिम कॉर्बेट नेशनल पार्क आणि काजीरंगा यासाठी दक्षिण केरळमधील पेरियार सेन्चुरीमध्ये सुद्धा हत्तीच्या सफारीचा आनंद तुम्हाला घेता येईल.