(image credit- hotels.comindia)
नवीन वर्षात फिरायला जाण्यासाठी जर तुम्ही उत्सुक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भटकंती करण्याची आवड असलेल्या लोकांसाठी एक खास पॅकेज आहे. याबद्दल तुम्हाला माहीती देणार आहोत. या पॅकेजमध्ये तुम्हाला थाइलँड, सिंगापुर, मलेशिया यांसारख्या प्रसिध्द ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. आईआरसीटीसीने परदेशात फिरण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांसाठी एक खास पॅकेज आणलं आहे. हे संपूर्ण पॅकेज ९ रात्र आणि १० दिवसांसाठी असणार आहे. यात तुम्हाला बँकॉक, पटाया, सिंगापुर आणि मलेशिया फिरता येणार आहे.
या पॅकेजची सुरूवात फेब्रुवारी महिन्यात इन्दोंर येथून होणार आहे. त्यानंतर बँकॉक मध्ये २ रात्र आणि पटाया मध्येसुद्धा २ रात्री आणि मलेशियात ३ रात्रीत फिरण्याचा आनंद घेता येणार आहे. या ठिकाणी फिरण्यासारखी इतकी ठिकाणं आहेत की तुम्ही या ठिकाणी गेलात तर आयुष्यभर विसरू शकणार नाही.
(image credit-.cntraveler.com)
थायलँडला जाण्यासाठी भारतीयांना विजा सुद्धा मिळणार आहे. थायलँडची राजधानी बँकॉक हे आपली नाईट लाईफ आणि मार्केट फिरण्यासाठी प्रसिध्द आहे. सुंदरतेचे आणि भव्यतेचे प्रतिक असलेल्या काही ऐतिहासीक ठिकाणांना भेटी देता येणार आहेत. याशिवाय पटायाचा बीच, शॉपिंग मॉल, आणि १८ फिट उंचीची गौतम बुध्दांची मुर्ती पहायला मिळणार आहे. मलेशीयात पेट्रोनास टावर्स पाहण्याचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे.
(image credit- traveltrangle)
सिंगापूरमध्ये फिरण्यासाठी सगळ्यात जास्त शॉपिंग करण्याची ठिकाणं आहेत. यूनिवर्सल स्टूडियोज, मेर्लिओन पार्क, सेंटोसा आइलँड, सिंगापुर फ्लायर, जुरॉंग बर्ड पार्क, विंग्स ऑफ टाइम, चीनाटौन, गार्डंस आहेत. यूनिवर्सल स्टूडियोज, मेर्लिओन पार्क, सेंटोसा आइलैंड, सिंगापुर फ्लायर, जुरॉंग बर्ड पार्क, विंग्स ऑफ टाइम, चीनाटाऊन, चांगी इंटरनेशनल एयरपोर्ट ही प्रेक्षणीय स्थळ आहेत.
या टूरसाठी येणारा खर्च
जर पॅकेजचा आनंद एका व्यक्तीला घ्यायचा असल्याल खर्च जास्त येणार आहे. तुलनेने २ व्यक्ती गेले तर पॅकेजचा खर्च कमी येतो. एका व्यक्तीसाठी १ लाख ३७ हजार ५०० इतका खर्च येणार आहे. तर दोन व्यक्ती गेल्यास १ लाख १४ हजार रूपये इतका खर्च प्रत्येक व्यक्तीला येणार आहे.