बाईक चालवताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 5:15 AM
सध्या सगळीकडच्यांच रस्त्यांची अवस्था पाहिल्यावर लक्षात येईल की, खूप मोठमोठे खड्डे या रस्त्यांवर आपल्याला दिसून येतात. या रस्त्यांवरून बाईक चालवणे हे काही सोपे काम नाही.
बाईक चालवण्याची क्रेझ जर तुम्हाला असेल तर मग तुम्ही जपूनच बाईक चालवायला हवी, असे अनेकदा कित्येकांनी तुम्हाला सांगितलेच असेल. मात्र, लोकांचे सांगणे आपण कुठे मनावर घेतो? आपण त्यांच्या सांगण्याला डावलून आपल्या मनाला जसे वाटेल तसेच तर करतो. सध्या सगळीकडच्यांच रस्त्यांची अवस्था पाहिल्यावर लक्षात येईल की, खूप मोठमोठे खड्डे या रस्त्यांवर आपल्याला दिसून येतात. या रस्त्यांवरून बाईक चालवणे हे काही सोपे काम नाही. नियंत्रण ठेवून जर बाईक चालवली तर बाईक रायडिंगचा आनंद सुरक्षितपणे आपल्याला लुटता येऊ शकतो. पाहूयात कोणत्या गोष्टींची बाईक चालवताना आपण विशेष काळजी घ्यायला हवी ते...१. बाईक चालवत असताना आपल्या चुकीमुळेच अपघात होईल असे नाही. तर इतरांच्या चुकीमुळेही आपल्या जीवाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे जीवाशी खेळ तडजोड करु नका.२. बाईक चालवताना कायम हेल्मेट वापरा. साधे कोणतेही हेल्मेट वापरणे धोक्याचे ठरु शकते, त्यामुळे आपले हेल्मेट आयएसआय मार्क असलेले असेल याकडे लक्ष द्या. हेल्मेटचे मटेरीयल चांगले आहे ना हे तपासून पाहण्याबरोबरच ते आपल्या डोक्यात योग्य पद्धतीने बसते का नाही ते पाहा.३. बाईकच्या वेगाबाबत योग्य ती काळजी घ्यायला हवी. बाईक चालवताना आपली नजर चुकणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. रस्ता आणि नियम यांच्यानुसारच बाईक चालवायला हवी.४. आपण चालवत असलेल्या बाईकच्या वेगाबाबत एक मर्यादा ठरलेली असते. त्यानुसार बाईक चालवायला हवी. आपल्या गाडीच्या मर्यादेपलिकडे जाणे टाळावे. गाडी शांतपणे चालवावी. विनाकारण वेगाने चालविणे टाळावे.५. आपण नियमित चालवत असलेल्या बाईकचे योग्य पद्धतीने सर्व्हीसिंग झाले आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे. गाडीचे ब्रेक, हॉर्न योग्य पद्धतीने चालत नसतील तरीही अनेक जण तशीच गाडी वापरत राहतात. मात्र हे धोक्याचे ठरु शकते. त्यामुळे गाडीचे वेळच्या वेळी सर्व्हीसिंग करणे आवश्यक आहे.६. गाडीला असणाऱ्या अँटी लॉक ब्रेकींग सिस्टीममुळे अनेक अपघात टळल्याचे आपण पाहतो. गाडीमध्ये हे फिचर असल्यास ते नक्कीच फायद्याचे ठरते. हे फिचर केवळ महागड्या गाड्यांनाच असते असे नाही. तर अनेक सामान्य गाड्यांमध्येही सध्या हे फिचर देण्यात आले आहे.