समुद्र किनाऱ्यावर बसून उसळणाऱ्या लाटा बघणे हा अनेकांसाठी एक वेगळाच अनुभव असतो. हा अनुभव अधिक आनंददायी होईल जेव्हा उसळणाऱ्या लाटांसोबत तुम्हाला डॉल्फिन्सही बघायला मिळतील. तुम्हालाही समुद्री लाटांसोबत मस्ती करणाऱ्या डॉल्फिन्स बघायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी ५ ठिकाणांचे पर्याय घेऊन आलो आहोत.
लक्षद्वीप
(Image Credit : India.com)
हे एक असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला स्वप्नातील अनुभव मिळेल. इथे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकता. स्कूबा डायव्हिंगपासून ते स्नॉर्कलिंग, सी वॉकिंगसारख्या अॅक्टिविटीही तुम्ही इथे करू शकता. त्यासोबतच इथे तुम्ही बॉटल्नॉल्ड डॉल्फिन्सही बघू शकता. या वेगळ्या प्रकारच्या डॉल्फिन्स इथे आढळतात.
दक्षिण गोवा
उत्तर गोव्यामध्ये लोकांची मोठी गर्दी असते. तर शांतता पसंत करणारे लोक हे दक्षिण गोव्यात फिरण्याला प्राधान्य देतात. दक्षिण गोवा सुद्धा डॉल्फिन्स बघण्यासाठी चांगला पर्याय आहे. तुम्ही गोव्यातील अगोंडा बीच, बटरफ्लाय बीच आणि हनीमून बीचवर डॉल्फिन्स बघू शकता. इथे डॉल्फिन्ससोबत सूर्यास्त बघणे एक फारच रोमांचक अनुभव असतो.
तारकर्ली (महाराष्ट्र)
(Image Credit : Wikipedia)
महाराष्ट्रातील सर्वात शांत समुद्र किनाऱ्यांपैकी एक म्हणजे तारकर्ली बीचवर सुद्धा तुम्हाला डॉल्फिन्स बघण्याची संधी मिळू शकते. इथे भरपूर प्रमाणात डॉल्फिन्स आढळतात. सूर्योदयावेळी इथे स्थानिक मच्छिमार पर्यटकांना डॉल्फिन टूर करवतात.
विक्रमशीला गॅंगटिक डॉल्फिन अभयारण्य
(Image Credit : Times Now)
बिहारच्या भागलपूर येथील विक्रमशीला गॅंगटिक डॉल्फिन अभयारण्य वन्य जीव प्रेमींसाठी स्वर्ग मानलं जातं. इथे आढळणाऱ्या डॉल्फिन्सला स्थानिक भाषेत सुसु म्हटले जाते. ही डॉल्फिन्सची एक कमी होत चाललेली प्रजाती आहे. हे अभयारण्य ५० किमी परिसरात पसरलेलं आहे. ऑक्टोबर ते जून महिना इथे फिरण्यासाठी परफेस्ट कालावधी आहे.
चिल्का लेक (ओडिसा)
ओडिसातील चिल्का लेकची वेगवेगळ्या जैव विविधतेमुळे देशभरात वेगळी ओळख आहे. इथे इरवाड्डी डॉल्फिन मोठ्या प्रमाणात आढळतात. डॉल्फिन सफारीचं हे एक प्रमुख आकर्षण केंद्र आहे. डॉल्फिनसोबतच तुम्ही इथे वेगवेगळे प्राणी बघू शकता.