शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

ख्रिसमस आणि न्यू इयर पार्टीसाठी ही पाच ठिकाणं एकदम परफेक्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 4:28 PM

ख्रिसमसची मजा केवळ विदेशातच नव्हे तर देशातही अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यातही या गोवा, केरळ, मुंबई, पद्दुचेरी आणि दिल्ली या शहरांमधला ख्रिसमस आणि न्यू इयर माहौल अगदी पाहण्यासारखा आणि अनुभवण्यासारखा असतो.

ठळक मुद्दे* ख्रिसमसच्या दिवसांत गोवा फिरण्याची मजा काही औरच असते. गोव्यात अगदी जगप्रसिद्ध असे चर्च आहेत, ज्या ठिकाणी अगदी पारंपरिक पद्धतीनं ख्रिसमस साजरा होतो.* फ्रेचांची वसाहत असलेलं पुदुच्चेरी मुळातच निसर्गसौदयार्नं नटलेलं आहे. इथल्या नितांतसुंदर समुद्र किना-यावर ख्रिसमसच्या सुट्टीचा आनंद तुम्हाला एक अनोखी मनशांती देतो.* मुंबईसाठी जे फोर्टचं स्थान आहे, ते दिल्लीकरांसाठी कनॉट प्लेसचं आहे. ख्रिसमसच्या दिवसांत एक वेगळीच रौनक कनॉट प्लेसमध्ये पाहायला मिळते.

-अमृता कदमनवीन वषार्चं स्वागत आणि ख्रिसमसची सुट्टी हा योग यामुळे या दिवसांत सहलीचं प्लॅनिंग होतंच. ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी प्रत्येकाचे आपापले प्लॅन असतात. पण ख्रिसमस पाटी आणि नवीन वर्षाची मजा दुप्पट करायची असेल तर काही खास ठिकाणांची माहिती करुन घ्या. ख्रिसमसची मजा केवळ विदेशातच नव्हे तर देशातही अनेक ठिकाणी पाहायला मिळते. त्यातही या पाच ठिकाणांवरचा माहौल हा अगदी बघण्यासारखा असतो.

गोवा

ख्रिसमस आणि गोवा हे जणू समीकरणच बनलंय. ख्रिसमसचं नाव काढलं की भारतात कुणालाही याच शहराचं नाव आठवतं. या दिवसांत गोव्यातल्या गल्ल्या रोषणाई आणि फुलांच्या आकर्षक सजावटींनी फुलून गेलेल्या असतात. त्यामुळे या दिवसांत गोवा फिरण्याची मजा काही औरच असते. गोव्यात अगदी जगप्रसिद्ध असे चर्च आहेत, ज्या ठिकाणी अगदी पारंपरिक पद्धतीनं ख्रिसमस साजरा होतो. शिवाय गोव्याची ओळख असलेल्या लेट नाईट पार्टीज, लाइव्ह म्युझिक पार्टी या तुमच्या ट्रिपचा आनंद आणखी वाढवतात.

 

केरळ

भारतात ज्या आणखी एका ठिकाणी ख्रिश्चन समाजाची संख्या लक्षणीय आहे त्यात केरळचं नाव समाविष्ट होतं. एरव्हीही पर्यटकांचं हे आवडतं राज्य आहेच. पण ख्रिसमस इथे अतिशय उत्साहात साजरा होत असल्यानं या दिवसांत केरळ काहीसं वेगळं भासतं. इथल्या रस्त्यारस्त्यांवर तुम्हाला ख्रिसमसची धूम पाहायला मिळते.

मुंबई

मुंबई हे देशातलं ख-या अथार्नं कॉस्मोपोलिटन शहर. त्यामुळे इथे प्रत्येक धर्मियांचा सण अनोख्या पद्धतीनं साजरा होत असतो. मुंबईचा गणपती उत्सव, माहीमच्या दर्ग्याचा उत्सव जितक्या थाटात होतो तितक्याच थाटात इथे ख्रिसमसही साजरा होतो. ख्रिसमसच्या दिवसांत बेकरीमध्ये ख्रिसमस स्पेशल पेस्ट्री केक, मफिन मुंबईतच मिळू शकतात. केवळ बेकरीच नव्हे तर मुंबईची शाँपिंगही ख्रिसमसच्या दिवसांत खास ठरते.

पुदुच्चेरी

फ्रेचांची वसाहत असलेलं पुदुच्चेरी मुळातच निसर्गसौदयार्नं नटलेलं आहे. इथल्या नितांतसुंदर समुद्र किना-यावर ख्रिसमसच्या सुट्टीचा आनंद तुम्हाला एक अनोखी मनशांती देऊन जाईल. त्यामुळे ख्रिसमसचा उत्साह आणि उल्हास अनुभवता येतो. शांती आणि सेलिब्रेशन याचा अतिशय सुंदर संगम असलेलं हे ठिकाण ख्रिसमसच्या सुट्टीसाठी पर्यटकांच्या हिट लिस्टवर असतं.

 

कनॉट प्लेस, दिल्ली

मुंबईसाठी जे फोर्टचं स्थान आहे, ते दिल्लीकरांसाठी कनॉट प्लेसचं आहे. ख्रिसमसच्या दिवसांत एक वेगळीच रौनक कनॉट प्लेसमध्ये पाहायला मिळते. जर तुम्ही पार्टीच्या मूडमध्ये असाल तर इथे तुम्हाला एकाहून एक असे सरस पर्याय उपलब्ध आहेत. अनेक प्रकारचे बार आणि रेस्टॉरण्ट ख्रिसमसच्या वेळी विविध उपक्रमांचंही आयोजन करत असतात.त्यामुळे ख्रिसमसला जोडून येणा-या सुटीचा आनंद ख-या अर्थानं लुटण्यासाठी यापैकी एका ठिकाणाची निवड करायला हरकत नाही.