ठळक मुद्दे* चेन्नई-रामेश्वरम या प्रवासातला सर्वोच्च क्षण म्हणजे जेव्हा रेल्वे थेट समुद्रावर बांधलेल्या पूलावरु न जात असते. दोन्ही बाजूला अथांग असा सागर आणि मधून धडधडत जाणारी रेल्वे हे अविस्मरणीय दृश्य तुम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं.* मांडवी एक्सप्रेसनं मुंबई-गोवा प्रवास करताना तुम्हाला अप्रतिम कोकणाचं दर्शन होतं. कोकणातली छोटी छोटी गावं, घनदाट जंगलं आणि बोगद्यातून डोळ्यासमोर सरकणारी शेकडो निसर्गचित्रं हे या प्रवासाचं वैशिष्ट्य आहे.* भारतातल्या प्रसिद्ध अशा हिल स्ट्रेशनपैकी एक कालका आहे. या ठिकाणी जाताना टॉय ट्रेनचा मार्ग निवडलात तर तुमचा प्रवास आणखी रंगतदार होईल.
- अमृता कदमविमान प्रवासानं वेळ वाचत असला तरी ट्रेनच्या प्रवासाची वेगळीच मजा आहे. इंजिनाच्या आवाजासोबत बाहेरचा निसर्ग अनुभवण्याची मजा ट्रेनमध्येच मिळू शकते. हिरवाईनं नटलेली शेतं, नदीचे शांत काठ, छोटी छोटी गावं, मंदिरं, पूल असं सगळं काही ट्रेनच्या प्रवासात डोळ्यांसमोरून सरकताना दिसतं, ज्यामुळे प्रवासाची गंमत आणखी वाढते. ट्रेनचा हा प्रवास आपल्याला अनेकदा नॉस्टेल्जिक करतो, कारण त्यासोबत आपल्या बालपणीच्या अनेक आठवणी जोडलेल्या असतात. ट्रेनच्या प्रवासाशी ज्यांचा हा भावनिक कनेक्ट आहे, त्यांनी भारतातल्या या रेल्वेमार्गांची ओळख करून घेतलीच पाहिजे. हे मार्ग बांधकामशास्त्राचे अजोड नमुने तर आहेतच पण इथल्या अतुलनीय निसर्ग दृश्यांसाठीही ते प्रसिद्ध आहेत.चेन्नई- रामेश्वरम मार्ग
चेन्नई-रामेश्वरम या प्रवासातला सर्वोच्च क्षण म्हणजे जेव्हा रेल्वे थेट समुद्रावर बांधलेल्या पूलावरु न जात असते. दोन्ही बाजूला अथांग असा सागर आणि मधून धडधडत जाणारी रेल्वे हे अविस्मरणीय दृश्य तुम्हाला वेगळ्याच दुनियेत घेऊन जातं. पुंडनचा हा पूल जगातल्या सर्वांत रोमांचकारी रेल्वेमार्गांत चौथ्या क्र मांकाचा गणला जातो. याशिवाय या प्रवासात तुम्हाला चेन्नईतल्या काही मंदिराचंही अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं.
मुंबई-गोवा रेल्वे मार्गबॉम्बे-टू गोवा असेल, दिल चाहता है अशा चित्रपटांनी या दोन शहरांमधला बाय-रोड प्रवास आधीच प्रसिद्ध केलेला आहे. पण मुंबई गोव्याला जोडणाºया रेल्वेमार्गाचा प्रवासही आनंददायी आहे. मांडवी एक्सप्रेसनं मुंबई-गोवा प्रवास करताना तुम्हाला अप्रतिम कोकणाचं दर्शन होतं. कोकणातली छोटी छोटी गावं, घनदाट जंगलं आणि बोगद्यातून डोळ्यासमोर सरकणारी शेकडो निसर्गचित्रं हे या प्रवासाचं वैशिष्ट्य आहे.लुमिडंग-सिलचर रेल्वे मार्गईशान्य भारतातल्या फार कमी ठिकाणी रेल्वे पोहचली आहे. त्यातला एक भाग म्हणजे आसाम. आसाममधल्या या दोन स्टेशनमधला रेल्वे प्रवास या प्रदेशाची ताकद तुम्हाला दाखवून जातो. दाट जंगल आणि खोल दरीतून जाणा-या रेल्वेचा हा प्रवास तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल असाच आहे. एकदा तरी याचा अनुभव घ्यायलाच हवा.
कालका, शिमला टॉय ट्रेनया अप्रतिम रेल्वे मार्गाची दखल यूनेस्कोनंही घेतलीय. भारतातल्या प्रसिद्ध अशा हिल स्ट्रेशनपैकी एक कालका आहे. या ठिकाणी जाताना टॉय ट्रेनचा मार्ग निवडलात तर तुमचा प्रवास आणखी रंगतदार होईल यात शंका नाही. ट्रेनमध्ये बसल्या बसल्या तुम्हाला इथल्या द-याखो-याचं अप्रतिम असं दर्शन घडतं.
कोकण रेल्वे मार्गब-याचदा कोकण रेल्वे म्हणजे गोव्यापर्यंतचाच प्रवास अशी गफलत होते. पण त्याही पलीकडे अगदी मंगलोरपर्यंत कोकण रेल्वे पसरली आहे. पश्चिम घाटाचं अनोखं सौंदर्य अनुभवायचं असेल तर या कोकण रेल्वेसारखं दुसरं माध्यम नाही. इथल्या डोंगर, नद्यांवर कोकण रेल्वेनं इतके अप्रतिम पूल बांधलेयत की तुम्ही ते पाहून थक्क व्हाल.हातात भरपूर वेळ असेल आणि निवांतपणे प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर विमान प्रवासाऐवजी ट्रेनच्या प्रवासाचा आवर्जून आनंद घ्या. आणि या मार्गांनी नक्की प्रवास करा.