नवी दिल्ली : मेघालयातील कोंगथोंग गावाला युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO)अवॉर्डसाठी बेस्ट टुरिझम व्हिलेजच्या कॅटगरीमध्ये नामांकित करण्यात आले आहे. भारतातील आणखी दोन गावांचाही या यादीत समावेश आहे. त्यात मध्य प्रदेशातील लधपूर खास आणि तेलंगणातील पोचमपल्ली गावाची नावेही समाविष्ट आहेत. पर्यटन स्थळाच्या दृष्टीने ही गावे पर्यटकांना खूप आवडतात. (Kongthong among 3 Indian entries for UNWTO ‘Best Village Contest’)
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'मध्य प्रदेशातील लाधपुरा खास गावाचा' बेस्ट टुरिझम व्हिलेज 'मध्ये प्रवेश करणे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. या कामगिरीसाठी मध्य प्रदेश पर्यटन आणि प्रशासनाच्या संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा. असेच चांगले काम करत राहा.
मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनीही 'बेस्ट टुरिझम व्हिलेज'मध्ये कोंगथोंग गावची नियुक्ती झाल्यावर ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. संगमा यांनी म्हटले आहे. 'मेघालयच्या कोंगथोंग गावाला भारताच्या इतर दोन गावांसह UNWTO च्या सर्वोत्तम पर्यटन गावांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.'
लाधपुरा खास गाव मध्य प्रदेशातील टीकमगढ जिल्ह्यातील ओरछा तालुक्यात आहे. याबाबत अधिक माहिती देताना पर्यटन आणि संस्कृतीचे प्रधान सचिव शेखर शुक्ला म्हणाले की, राज्याच्या 'ग्रामीण पर्यटन प्रकल्प' अंतर्गत पुढील पाच वर्षांत 100 गावे विकसित केली जातील.
शिलाँगपासून सुमारे 60 किमी अंतरावर स्थित कोंगथोंग गाव त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि वेगळ्या संस्कृतीसाठी खूप लोकप्रिय आहे. हे गाव 'व्हिसलिंग व्हिलेज' या नावानेही प्रसिद्ध आहे. हे 12 गावांपैकी एक आहे जिथे एका विशिष्ट प्रकारचा 'आवाज' मुलाशी त्याच्या जन्मापासूनच जोडला जातो. हा आवाज आयुष्यभर त्याच्यासोबत राहतो. ही परंपरा आजही कायम आहे.