(Image Credit : Wheelstreet)
पावसाळा सुरू होताच बाईक रायडर्स आपल्या मित्रासोबत लॉन्ग रोड ट्रिपचा प्लॅन करू लागतात. कारण पावसाळ्यात बाईक रायडिंगची आपलीच एक वेगळी मजा असते. एकीकडे हिरवीगार झाडे, थंड वारा आणि पावसाची रिमझिम या वातावरणात बाईकवर फिरायला जाण्याचा आनंद अनेकजण घेत असतात. पण भारतातील रस्त्यांची स्थिती पाहता कधी कधी पावसाळ्यात बाईक रायडिंग घातकही ठरू शकते. त्यामुळे बाईक रायडिंगला जाण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते.
हेल्मेटमध्ये बदल
(Image Credit : ZigWheels)
मॉन्सूनमध्ये तुम्ही जर लॉन्ग ड्राईव्हला जात असाल तर गरजेचं आहे की, हेल्मेटमध्ये अॅंटी-फॉग कोटींग करा. जेणेकरून पावसात हेल्मेटच्या काचेवर जमा होणाऱ्या दवांमुळे बईक चालण्यात अडचण येऊ नये. अॅंटी-फॉग कोटिंगने तुम्हाला पावसातही समोरचं व्यवस्थित दिसेल.
वॉटरप्रूफ रायडिंग गिअर
(Image Credit : India.com)
मॉन्सूनमध्ये बाईकने फिरायला जाणार असाल तर महत्त्वाच्या कामांमध्ये वॉटरप्रूफ रायडिंग गिअरचाही समावेश करा. हाय-व्हिजिबिलीटी रेनकोट घ्या, जो तुम्ही कपड्यांवर किंवा रायडिंग जॅकेटसोबत घालू शकाल. याने तुम्ही पावसात भिजणार नाही आणि तुम्हाला थंडीही वाजणार नाही.
टायर्स करा चेक
(Image Credit : DriveSpark)
लॉन्ग राइडला जाण्यापूर्वी तुमच्या बाईकच्या टायर्सची स्थिती चेक करा. याची काळजी घ्या की, टायरची ग्रीप व्यवस्थित असावी. याने रस्त्यावर स्लीप होण्याचा धोका राहणार नाही. तसेच तुम्ही योग्यप्रकारे तुमचा वेग कायम ठेवू शकाल आणि बिनधास्त होऊन रायडिंगचा आनंद घेऊ शकाल.
रस्त्यावर ठेवा लक्ष
(Image Credit : Autocar India)
जोपर्यंत तुमची खात्री होत नाही की, रस्त्याची स्थिती पूर्णपणे चांगली आहे, तोपर्यंत रायडिंगदरम्यान रस्त्यावरून नजर हटवू नका. कारण अचानक समोर येणारा खड्डा तुम्हाला अडचणीत टाकू शकतो. बरं होईल की, रायडिंगला जाण्याआधी कुणाकडून रस्त्याची स्थिती जाणून घ्या.
बदला रायडिंगची स्टाइल
(Image Credit : YouTube)
तुम्ही कितीही चांगली रायडिंग करत असाल तरी सुद्धा रस्त्याची वाईट स्थिती प्रत्येक रायडरला समान रूपाने प्रभावित करते. रायडिंग करताना आजूबाजूच्या वाहनांमध्ये योग्य अंतर ठेवणे महत्त्वाचं असतं. नेहमी लक्षात ठेवा की, पावसात अचानक ब्रेक लावणे टाळले पाहिजे. कारण झटका लागून गाडी स्लीप होण्याचा धोका असतो. त्यामुळे गाडी फार वेगानेही चालवू नका आणि ब्रेकही आरामात लावा.