भारत एक असा देश आहे जिथे फिरण्यासाठी पर्यायच पर्याय आहेत. महत्त्वाची गोष्टी म्हणजे प्रत्येक ठिकाणाची एक वेगळी खासितय आहे. फेब्रुवारी महिन्यातील वातावरण फारच चांगलं मानलं जातं. त्यामुळे या महिन्यात फिरायला जाण्याचीही एक वेगळीच मजा असते. त्यामुळे आम्ही फेब्रुवारीमध्ये फिरण्यासाठी तुमच्यासाठी काही पर्याय घेऊन आलो आहोत.
माल देवता, उत्तराखंड
देहरादून हे भारतातील अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथून साधारण १८ किमी अंतरावर माल देवता आहे. इथे डोंगरांमधून खाली कोसळणारं पाणी पर्यटाकांना खास आकर्षित करतं. म्हणजे देहरादूनला गेलात आणि माल देवता इथे भेट दिली नाही तर फार काही मिस केल्यासारखं होतं. इथे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकता. कॅंपिंग ट्रेकिंगसह तुम्ही इथे ट्रेकिंगचाही अनुभव घेऊ शकता. देहरादूनचं जवळील एअरपोर्ट हे शहरापासून २० किमी दूर आहे. दिल्लीहून देहरादूनसाठी बसेस, टॅक्सी सुरू असतात. रेल्वेनेही तुम्ही देहरादूनला जाऊ शकता.
आग्रा, उत्तर प्रदेश
विकेंडसाठी आग्रा देखील एक चांगला स्पॉट आहे. फेब्रुवारीमध्ये इथे ताज महोत्सवाचं देखील आयोजन केलं जातं. ताजमहालसोबतच इथे अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. मेहताब बाग इथेही तुम्ही जाऊ शकता. या बागेची कल्पना ताजमहालच्या आधी करण्यात आली होती. येथूनही तुम्ही ताजमहालचा नजारा पाहू शकता. येथूनच जवळ असलेल्या फतेहपूर सीकरीला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता.
मोरनी, हरयाणा
हरयाणातील मोरनी हे सुद्धा एक फार सुंदर ठिकाण आहे. निसर्ग प्रेमींसोबत अॅडव्हेंचरची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण बेस्ट आहे. इथे तुम्ही बोटींग, ट्रेकिंग आणि कॅंपिंगचा आनंद घेऊ शकता. तसेच येथील शिवालिक डोंगरावरील ऐतिहासिक किल्लाही सर्वांना आकर्षित करतो. येथूनच ९ किमी अंतरावर टिक्कर ताल म्हणून एक ठिकाण सुंदर ठिकाण आहे. लहान मुलांना सोबत घेऊन जात असाल तर इथे एक अॅडव्हेंचर थीम पार्कही आहे. इथे आल्यावर तुम्हाला एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळेल.
नीमराणा, राजस्थान
राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील नीमराणा हे सुद्धा या दिवसात फिरायला जाण्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन मानलं जातं. नीमराणा हे ऐतिहासिक किल्ल्यासोबतच तलाव, व्हॅली आणि वाइल्डलाइफसाठीही प्रसिद्ध आहे. हे दिल्लीहून साधारण १२२ किमी अंतरावर आहे. येथील नीमराणा फोर्ट पॅलेस चांगलाच प्रसिद्ध आहे. हा किल्ला येथील तीन एकर परिसरात एका डोंगराला कापून तयार करण्यात आला आहे. यातील नक्षीकामही फारच सुंदर आहे. दिल्लीहून अलवरसाठीही बसेस सुरू असतात. कारने गेलात तर दिल्लीहून ३ ते ४ तासात इथे पोहोचाल.
शिमला, हिमाचल प्रदेश
फॅमिलीसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन असेल तर शिमला हे फेब्रूवारीमध्ये फिरण्यासाठी सर्वात बेस्ट डेस्टिनेशन आहे. या दिवसात इथे तुम्ही बर्फाचाही मनमुराद आनंद घेऊ शकता. तसेच येथील माल रोड खाण्या-पिण्यासाठी आणि शॉपिंगसाठी परफेक्ट जागा आहे. इथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत.