फुकेत हे सुद्धा थायलँडमधील सर्वात रोमॅंटिक ठिकाणांपैकी एक आहे. खरं तर थायलँड भारतापासून अत्यंत जवळ आहे. त्यामुळे हे शहर वर्षभर पर्यटकांनी गजबजलेलं असतं. फुकेतमधील समुद्र किनारे पर्यंटकांना फार आकर्षित करतात. क्रिस्टलसारखं स्वच्छ आणि चमकतं पाण्याच्या समुद्र किनाऱ्यावर दूरदूरपर्यंत पसरलेली ताडाची झाडे डोळ्यांना वेगळाच आनंद देतात. हे ठिकाण रोमॅन्टिक ठिकाण म्हणून ओळखलं जातं. येथील अल्हाददायी हवेतच गारवा आहे, असं म्हटलं तरि वावगं ठरणार नाही.
ज्या लोकांना जास्त गर्दी असलेल्या ठिकाणी फिरायला आवडत नाही, त्यांच्यासाठी फुकेत हे बेस्ट डेस्टिनेशन आहे. परंतु येथे थंडीमध्ये गेलात तर येथे तुम्हाला फार गर्दी मिळते. त्यानंतर येथे एप्रिल मे पर्यंत उन्हाळा असतो आणि जूनपासून ऑक्टोबरपर्यंत पावसाळा असतो.
जेव्हाही तुम्ही फुकेतला भेट द्याल त्यावेळी फांग नगा बे आणि जेम्स बॉन्ड यांसारख्या बेटांना भेट द्यायला विसरू नका. जेम्स बॉन्ड सीरीजमधील 'मॅन इन द गोल्डन गन' या भागाची शूटिंग या बेटावर झाली होती. म्हणूनच या बेटाला जेम्स बॉन्ड असं म्हणतात. जर तुम्हाला येथे समुद्राच्या आतील जग अनुभवण्याची इच्छा असेल तर येथे तुम्ही स्कूबा डायविंगचाही आनंद घेऊ शकता. येथे तुम्हालाशार्क, ऑक्टोपस आणि इतर रंगीबेरंगी मासे पाहण्याची संधी मिळेल.
फुकेतमध्ये राहणे अजिबात महाग नाही. इथे तुम्ही आरामात 2 ते 3 दिवस घालवू शकता. इथे तुम्ही स्पा चा आनंदही घेऊ शकता. तसेच जवळच असलेल्या 4 आयलॅंडवरही फिरायला जाता येऊ शकतं.
फुकेतच्या आसपास अनेक छोटी छोटी बेटं असून यांपैकी फेमस बेट म्हणजे, फि फिद्विप आहे. येथे येणारे पर्यटक रात्रभर येथे राहून रात्रीच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेतात.
थायलँडमधील सर्वात सुंदर बेटांपैकी एक बेट म्हणजे फुकेट. त्यामुळे तुम्हीही एखाद्या बेटावर जाऊन आपला हॉलिडे एन्जॉय करण्याचा विचार करत असाल तर फुकेतमध्ये फिरायला जाण्याचा नक्की प्लॅन करा.