अनेकदा आपण लांबचा प्रवास करताना एसी ट्रेनने करतो. त्यावेळी भारतीय रेल्वेकडून देण्यात आलेल्या सगळ्या सुविधांचा लाभ घेतला जातो. रेल्वेकडून प्रवासादरम्यान दिल्या जात असलेल्या ब्लॅंकेट, बेडशीट आणि उशीचा वापर तुम्ही नक्कीच केला असेल. रेल्वेमध्ये बेडशीट आणि उशांचे कव्हर रोज धुतल्या जातात त्यानंतरच प्रवाशांना दिल्या जातात.
मुंबई-दिल्ला राजधानी अशा ट्रेनमध्ये मिळत असलेले ब्राऊन आणि काळ्या रंगाचे मोठे ब्लॅंकेट महिन्यातून फक्त एकदा धुतले जातात. भारतातील रेल्वे जगातील सगळ्यात मोठ्या नेटवर्कपैकी एक आहे. रेल्वेची व्यवस्था आणि सुविधेविषयी तुम्ही RTI मार्फत माहिती घेऊ शकता. एसी कंपार्टमेंटमध्ये दिल्या जात असलेल्या ब्राऊन आणि लाल रंगाच्या ब्लँकेट्स फक्त महिन्यातून एकदाच धुतल्या जातात. पांढरी चादर आणि उशीचे कव्हर यांची रोज स्वच्छता केली जाते. ( हे पण वाचा- तिरूपती बालाजीच्या हनुवटीवर का लावतात चंदन? 'या' मंदिराबद्दल आश्चर्यकारक गोष्टी वाचून व्हाल अवाक्)
अनेक प्रवाश्यांनी बेडशिट महिन्यातून फक्त एकदा धुतली जाण्याच्या कारणावरून प्रश्न सुद्धा विचारले आहेत. रेल्वेकडून आलेल्या उत्तरानुसार राजधानी ट्रेन ८३ हजार किलोमीटरचा प्रवास करते. तेव्हा ब्लँकेटस फक्त एकदा धुतले जातात. पश्चिम रेल्वेचे चीफ पब्लिक रिलेशन ऑफिसर यांना याबाबत विचारणा केल्यास त्यांनी सांगितलं की ब्लँकेट सुती आणि जड असल्यामुळे फक्त ५० वेळा धुतली जाते. ( हे पण वाचा- कसलीही वाट न पाहता, फिरण्यासह ट्रेकिंगच्या अनुभवासाठी 'या' किल्ल्याला भेट द्या) ( image credit- financial express)