'हे' आहेत भारतातील सगळ्यात सुंदर अन् जगप्रसिद्ध ५ चर्च; एकदा नक्की भेट द्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 06:21 PM2020-12-25T18:21:33+5:302020-12-25T18:26:47+5:30
Travel tourism Tips in Marathi : बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला भारतातील प्रसिद्ध चर्चबद्दल सांगणार आहोत.
दरवर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो. धार्मीक मान्यतांनुसार या दिवशी येशू ख्रिस्तांचा जन्म झाला होता. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला भारतातील प्रसिद्ध चर्चबद्दल सांगणार आहोत.
क्राइस्ट चर्च, शिमला
या चर्चविषयी असे म्हटले जातं की, उत्तर भारतातील हा सर्वात जुना चर्च आहे. सौंदर्याच्या बाबतीत हा भारतातील सर्वात सुंदर चर्च आहे. ख्रिसमसवेळी या चर्चचे सौंदर्य काही नवीनच असते. जर तुम्ही कधी शिमलाला गेलात तर एकदा क्राइस्ट चर्चला जा.
सेंट अँड्र्यू बासिलिका चर्च
हा सेंट सेबस्टियनमधील सर्वात मोठा चर्च मानला जातो. हा केरळमधील चर्च आहे आणि सेंट सेबस्टियन आंतरराष्ट्रीय आर्थरनलमध्ये हा चर्च प्रसिद्ध आहे. सेंट अँड्र्यू बॅसिलिका चर्च पोर्तुगीजांनी 16 व्या शतकात बांधला होता.
वेलंकनी चर्च
या चर्चची सुंदरता पाहण्यासारखी आहे. हा चर्च ख्रिसमसच्या काळात इतका सुंदर सजवलेला असतो की याच्या सौंदर्याकडे पाहताना लक्ष दुसरीकडे देणं कठीण होतं. बंगालच्या खाडीच्या किनारी हा चर्च आहे. याची चर्चची सुंदरता अधिकाधिक वाढत आहे.
सेंट पाऊल चर्च, कोलकाता
ब्रिटशांच्या काळात या चर्चचे निर्माण करण्यात आले होते. या चर्चचा पाया १८३९ मध्ये रचला गेला होता. १८४२ मध्ये हा चर्चा संपूर्ण बनून तयार झाला. या चर्चची रचना भारतीय शैलीत करण्यात आली आहे. तुम्ही जेव्हाही कोलकात्याला जाल तेव्हा या चर्चला नक्की भेट द्या.
मेडक कॅथड्रल, तेलंगणा
तेलंगणातील सगळ्यात सुंदर चर्चमध्ये या चर्चची गणना केली जाते. आपल्या सुंदरतेसाठी हा चर्च जगभरात प्रसिद्ध आहे. या चर्चच्या मध्ये अनोख्या लाद्या लावल्या आहेत. या लाद्या इंग्लँडवरून आणलेल्या आहेत.