>> सौरभ सुरेश म्हाळस, संगमनेर
वाईल्ड कॅट प्रेमींसाठी आकर्षक ठिकाण म्हणजे राजस्थानमधलं जवाई लेपर्ड हिल! 'जवाई बांध' या मोठ्या सरोवराच्या भोवती पसरलेल्या या सर्व टेकड्यांमुळे हा परिसर रमणीय झाला आहे. इथल्या मध्यम उंचीच्या खडकाळ टेकड्या हे खूप साऱ्या बिबट्यांचं आवडतं ठिकाण आहे. खूप मोठ्या संख्येने बिबटे या टेकड्यांवर मुक्त संचार करत असतात.
जवाई येथील या टेकड्या पुरातन मंदिर शृंखलेसाठी प्रसिद्ध आहेत येथील टेकड्यांवर असलेल्या विविध मंदिरांच्या पायऱ्यांवर आरामात बसलेले आणि बोचऱ्या थंडीत ऊन खात निवांत पहुडलेले बिबटे बघणं म्हणजे एक मोठी पर्वणी असते. येथील मंदिरांमध्ये भरपूर भाविक येजा करत असतात परंतु हे बिबटे मात्र तेथील नागरिकांना,पर्यटकांना कोणतीही इजा पोहोचवत नाहीत हे इथले वैशिष्ट्य सुप्रसिद्ध आहे.
निशाचर असलेला हा लाजाळू प्राणी मात्र दिवसातल्या वेगवेगळ्या प्रहरांमध्ये सुद्धा आपल्याला अगदी जवळून दर्शन देतो. त्यामुळे जवाई हे वाइल्ड सफारी प्रेमींचं सध्या आवडतं डेस्टिनेशन ठरत आहे.
सप्टेंबर पासून तर एप्रिल पर्यंतचा काळ हा या लेपर्ड सफारीसाठी अतिशय अनुकूल असून मोठ्या प्रमाणात पर्यटकांचे पाय जवाई कडे वळतात. सध्या राजस्थान राज्याचे पर्यटन मंत्रालय सुद्धा जवाई च्या बिबट्यांचा नैसर्गिक अधिवास जपत तिथला मोठ्या प्रमाणात करत आहे. अशा या बिबटप्रिय स्थळाला भेट देणे हा नितांत सुंदर अनुभव असतो यात शंकाच नाही.
बिबट दर्शनासोबतच जवाई मधला आपला स्टे हा अतिशय कम्फर्टेबल आणि इलाईट अशा रिसॉर्टमध्ये असला की आपली ही सफारी 'क्या बात' होऊन जाते. अशा शेकडो हजारो वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रेक्षणीय पर्यटनस्थळांनी आपला भारत देश नटला आहे सजला आहे. म्हणूनच प्रसिद्ध कवी डॉ चंद्रभानू त्रिपाठी आपल्या संस्कृत काव्यामध्ये म्हणतात,
प्रकृत्या सुरम्यं विशालं प्रकामंसरित्तारहारैः ललामं निकामम् ।हिमाद्रिर्ललाटे पदे चैव सिंधुःप्रियं भारतं सर्वदा दर्शनीयम् ।।
संपर्क : 8830313849