शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

यू ट्यूबवरचे प्रवासी

By admin | Published: April 12, 2017 1:28 PM

प्रवासाइतकेच इंटरेस्टिंग असतात ते प्रवासी. एका पॅशननं करत असलेला त्यांचा प्रवास नुसता पाहतानाही आपल्याला थक्क करून टाकतात. असे प्रवास वेडे प्रवासी आणि त्यांचा प्रवास यू-ट्यूबवर पाहायला मिळतो.

 

प्रवासाइतकेच इंटरेस्टिंग असतात ते प्रवासी. एका पॅशननं करत असलेला त्यांचा प्रवास नुसता पाहतानाही आपल्याला थक्क करून टाकतात. असे प्रवास वेडे प्रवासी आणि त्यांचा प्रवास यू-ट्यूबवर पाहायला मिळतो.
 

प्रवास केल्यानंतर त्याचा अनुभव इतरांसोबत शेअर करताना त्या प्रवासाचा आनंद द्विगुणित होतो. म्हणूनच आधी प्रवासात काढलेल्या फोटोंचा अल्बम बनवला जायचा आणि तो इतरांना दाखवताना, तिथले किस्से सांगताना पुन्हा एकदा प्रवासाची मजा घेतल्यासारखं वाटायचं. आता फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरवर आपल्या प्रवासाचे फोटो टाकून आणि प्रवास करत असतानाच आपले स्टेटस प्रवास करत असतानाच अपडेट करत राहून आपण कसं एन्जॉय करतोय हे आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवलं जातं.

यू ट्यूब चॅनेलमुळे तर हे प्रवासवर्णन अजूनच सोपं झालं आहे. यू ट्यूबवर आपल्या ट्रॅव्हल शोजच्या माध्यमातून काही हौशी ट्रॅव्हलर आपलल्याला अनेक अनवट ठिकाणी घेऊन जातात, तर प्रवास कसा करावा याच्या छोट्या-छोट्या टीप्सही देतात. काही जणांचा फोकस केवळ वाइल्ड लाइफ असतो. तर काहींचा ऐतिहासिक स्थळं. असे काही निवडक ट्रॅव्हलर आणि त्यांच्या यू ट्यूब चॅनेल्सची माहिती करु न देण्याचा हा प्रयत्न.

* सिड- द वाँडरर (Sid- The Wanderer)- व्यवसायानं डिझायनर आणि मनानं अगदी भटक्या असलेल्या सिद्धार्थ जोशीचं हे यू ट्यूब चॅनेल. सिद्धार्थ एकट्यानंच भटकंती करतो. तो प्रवास पर्यटनस्थळांना भेटी देण्याच्या उद्देशानं करत नाही, तर स्थानिक संस्कृती जाणून घेण्यासाठी, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्या त्या ठिकाणचे अनुभव गाठीशी बांधण्यासाठी करतो. त्याच्या चॅनेलवरचे व्हिडीओ पाहतानाही हेच जाणवत राहतं. सिद्धार्थ ट्रॅव्हल ब्लॉगही लिहतो. आणि त्याचा ब्लॉग हा भारतातल्या पहिल्या दहा ट्रॅव्हल ब्लॉगपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे.

* इंद्राणी घोष- इंद्राणी फ्री-लान्स ट्रॅव्हल रायटर आणि फोटोग्राफर आहे. देश-विदेशातल्या तब्बल 222 शहरांमधून फिरलेल्या इंद्राणीचा प्रवास अजूनही सुरूच आहे. प्राचीन शिल्पं आणि त्या त्या प्रदेशात मिळणारे विशिष्ट खाद्यपदार्थ हे प्रवासातले इंद्राणीचे खास आकर्षणाचे विषय!

* आदित्य पाठक- संगीताचा शौकीन असलेल्या आदित्यचा ट्रॅव्हल ब्लॉगही आहे. ऐतिहासिक ठिकाणं आणि प्राचीन स्थापत्य हे जरी आदित्याच्या आवडीचे विषय असले तरी त्याच्या चॅनेलवर खाद्यपदार्थाशीही संबंधित वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. त्याचे दिल्लीतल्या खाद्यभ्रमंतीबद्दलचे व्हिडीओ विशेष दखल घेण्यासारखे आहे.

* कुंझुम टीव्ही 2007सालापासून कुंझुम भारत आणि भारतीय उपखंडामध्ये प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी जणू गाइडचीच भूमिका बजावताना दिसतंय. या चॅनेलवरुन मिळणारी माहिती ही अत्यंत खात्रीलायक असते. त्यामुळेच तुमच्या प्रवासाचं नियोजन करताना तुम्ही नक्कीच कुंझुम टीव्ही ‘रेफर’ करु शकता.

* लक्ष्मी शरथ- लक्ष्मी मीडियामध्ये काम करते. तिला फिरायला तर आवडतं पण त्याबरोबरच ट्रॅव्हल ब्लॉगिंग आणि फोटोग्राफी हे देखील तिचे छंद आहेत. 2008साली भारतातल्या त्यावर्षीच्या सर्वोत्तम ट्रॅव्हल ब्लॉगचा पुरस्कारही मिळाला होता. अनेक जण आवर्जून हा ब्लॉग वाचतात. शिवाय देशातल्या उत्तम ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये त्याची गणना होते. लक्ष्मीनं केरळमधल्या नृत्यकलेचं केलेलं चित्रणही युट्यूबवर पाहायला मिळतं.

* अंकिता सिन्हा- ‘माय वर्ल्ड, माय वे’ म्हणत भारत आणि जगातल्या जवळपास अठरा देशांमधून भटकंती केलेल्या अंकिताला भारतातील ‘सर्वोत्कृष्ट ट्रॅव्हल रायटर’ म्हणून गौरवण्यात आलं आहे. केवळ आपण बघितलेल्या पर्यटनस्थळांची जंत्री वाढवण्यापेक्षा, ती ठिकाणं एक्सप्लोअर करण्यावर अंकिताचा अधिक भर असतो. अंकिताची ही भटकंती अनुभवण्यासाठी तुम्ही अँकीज ट्रॅव्हल टीव्हीला नक्कीच भेट देऊ शकता.

* संकरा सुब्रमण्यम- ज्यांना अडव्हेंचर ट्रॅव्हलची आवड आहे, त्यांना नक्कीच संकरा सुब्रमण्यमचे ब्लॉग आणि त्याचं चॅनेल दोन्हीही