- अमृता कदमअमूक या देशाला निसर्गसौंदर्याचं वरदान लाभलं आहे, तुम्हाला इथे निवांतपणा मिळेल, एक वेगळी संस्कृती अनुभवायला मिळेल, वेगवेगळ्या चवीचे पदार्थ खायला मिळतील...हे वाचल्यावर तुम्हाला इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असेल, आपल्याला बुकिंग कसं मिळेल असे प्रश्न पडतील. मात्र ही काळजी सोडून द्या. कारण एवढं सगळं असलेल्या या देशाला सर्वांत कमी पर्यटक भेट देतात. दक्षिण पॅसिफिक महासागरात वसलेला हा चिमकुला देश आहे तुवालू. हवाई बेटं आणि आॅस्ट्रेलियाच्या मधोमध तुवालू आहे. अजून जास्त नेमकेपणानं सांगायचं तर फिजीचा हा शेजारी. फिजीपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर तुवालू आहे. पण फिजीला भेट देणा-या पर्यटकांच्या तुलनेत तुवालूला भेट देणा-या पर्यटकांची संख्या अगदीच नगण्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वर्ल्ड टूरिझम आॅरगनायझेशननं तर 2016 सालातलं ‘लीस्ट व्हिजिटेड डेस्टिनेशन’ म्हणून तुवालूचा उल्लेख केला आहे.या अहवालानुसार 2016 मध्ये या देशाला भेट देणा-या पर्यटकांची संख्या होती अवघी दोन हजार. अर्थात 2014 शी तुलना करता हा आकडा जास्तीच होता. 2014 साली या देशाला हजार पर्यटकांनीच भेट दिली होती. नीलमण्यासारखा समुद्र, पांढ-या शुभ्र रेतीचे समुद्रकिनारे, सुंदर प्रवाळं, किना-यावरची पाम वृक्षांची रांग...अशाच शांत आणि आॅफबीट ठिकाणं शोधण्याचा पर्यटकांचा कल वाढत असताना तुवालूला अजूनही पर्यटकांच्या विश लिस्टमध्ये आपली जागा का निर्माण करता आली नाहीये? हे एक कोडंच आहे.इतरांनी जरी तुवालूकडे पाठ फिरवली असली तरी तुम्ही मात्र या ठिकाणाचा विचार जरु र करु शकता.तुवालूला आहे काय?
3. स्थापत्यया देशात एका बाजूला तुम्हाला पामच्या झाडांचा उपयोग करु न बनवलेली खोपटासारखी घरं दिसतील. तर दुस-या बाजूला युरोपियन पद्धतीच्या इमारती. खरंतर इथले लोक घरं बांधण्यासाठी सिमेंट-कॉंक्रि टचा अजिबात वापर करत नाहीत. ही गोष्ट त्यांना युरोपियन लोकांनी शिकवली. पण अजूनही बरेच लोक परंपरागत पद्धतीच्या घरातच राहणं पसंत करतात.4. चवदार खाद्यपदार्थतुवालूच्या लोकांच्या आहारातला मुख्य घटक आहे नारळ आणि मासे. इथल्या खास पदार्थांमध्ये नारळ, ब्रेडफूट आणि केळ्यांचा वापर करुन बनवलेला ‘पुलाका’ हा पदार्थ विशेष आहे.तुवालूला जाणं कठीण असेल, राहण्याच्या सोयी नीट नसतील असे विचार मनात येत असतील तर ते काढून टाका. हा देश काही दुर्गम नाही. तुम्ही फिजीला जाऊन तिथून पुढे तुवालूला जाऊ शकता. किंवा एअर पॅसिफिकची या बेटासाठी खास विमानसेवाही आहे. हां, हे शोधण्यासाठी तुम्हाला नक्कीच थोडे कष्ट घ्यावे लागतील. इथे राहण्यासाठी चांगली हॉटेल्स आणि गेस्टहाऊसही आहेत. इंग्लिश हीच आता इथली अधिकृत भाषा झाल्यानं संवाद साधण्यातही अडचणी येत नाही.तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल, मित्र-मंडळींबरोबर फिरायला जाणार असाल, एकदम आॅफ बीट ठिकाणाच्या शोधत असाल तर नक्की तुवालूचा आॅप्शन ट्राय करून पहायला हरकत नाही. जिथं सगळ्यांची गर्दी होते, ते ठिकाण सुंदर असलंच पाहिजे असं नाही. त्यामुळे पर्यटनातली रूळलेल्या ठिकाणांना काट मारु न तुवालूची सफर करून तर या!