शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
2
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: उद्धव ठाकरेंनी संपूर्ण भारताची माफी मागायला हवी- किरीट सोमय्या
4
IPL २०२५ आधी ८.५ कोटींचा 'बोनस'; भारतीय पठ्ठ्यानं ऑस्ट्रेलियात सेंच्युरीसह साजरी केली 'दिवाळी'
5
UPI युझर्ससाठी गूड न्यूज; १ नोव्हेंबरपासून बदलले 'हे' २ नियम; कोणाला मिळणार फायदा?
6
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने दिवाळीत दाखवली लेकीची पहिली झलक, ठेवलं हे नाव
7
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
8
तुम्हीही SIP द्वारे गुंतवणूक करता? 'या' ५ Mutual Funds नं ५ वर्षांत दिलाय ३० टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न
9
कॅनडा-भारत तणावपूर्ण वातावरणात PM ट्रुडो यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, हिंदूंबद्दल म्हणाले...
10
Post Office Time Deposit: पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये पैसे गुंतवलेत? करा फक्त १ काम, मिळेल मूळ रकमेपेक्षा दुप्पट रक्कम
11
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
12
'पाणी' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आदिनाथ म. कोठारे करणार 'या' चित्रपटाचं दिग्दर्शन
13
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
14
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
15
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
16
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
17
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
18
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
19
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
20
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन

749 दिवस, 17 देश आणि विष्णुदास!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 10:23 AM

विष्णुदास चापके. मुंबईत पत्रकार म्हणून काम करायचा. चक्क लॉटरीत सिडकोचं घर लागलं होतं त्याला. ...पण ते सोडलं आणि हा वेडा तरुण एका वेड्या स्वप्नामागे निघाला. १९ मार्च २०१६ या दिवशी त्याने घर सोडलं, ते जग पाहायला! खिशात पैसे नाहीत, वाटेतल्या देशांच्या व्हिसाची प्रोसेसबिसेस केलेली नाही. कुठे राहणार माहिती नाही. खर्च कसा भागणार ठाऊक नाही. जमेल तोवर पुढे पुढे जात राहायचं, वाटेत भेटतील त्या माणसांशी दोस्ती करून मिळेल ती मदत घ्यायची, इतकाच प्लॅन! - होण्डुरास नावाच्या देशातून हा लेख लिहिला.तेव्हा विष्णुदासच्या प्रवासाचा 749 वा दिवस होता, आणि आजवर एकूण 17 देश फिरून झाले होते... त्याच्या भन्नाट प्रवासाची ही गोष्ट!!

खिशात पैसे नसताना थेट जगप्रवासाला निघालेला एक मित्र. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ पाहिल्यावर वाटलं, की मुलींनी का करू नये अशी मजा?... म्हणून तीन देशात राहाणार्या आठ मैत्रिणींनी ठरवेली स्पेनची सहल. ... आणि स्वत:बरोबर थोड्या गप्पा व्हाव्यात, स्वत:ला अधुनमधून तपासायला मिळावं, म्हणून एकटीनेच फिरण्याचं वेड घेतलेली एक मैत्रीण. ... असे तीन लेख या अंकात आहेत!दहावी-बारावीची परीक्षा संपल्यावर, बाकीच्यांच्या संपायच्या बेतात असताना हे लेख प्रसिध्द करण्यामागे एक खास प्ल्नैन आहे : ज्यालात्याला हे भटकंतीचं वेड लागावं! तर वाचा...आणि निघा! परदेशात नाही जमलं, तर शेजारच्या गावाला तरी जाऊच शकाल की!

 

- विष्णुदास चापकेताई, भावोजी आणि माझ्या दोन गोड भाच्या मला सोडायला ठाणे स्थानकावर आल्या होत्या. आम्ही सगळे गप्प गप्प होतो. माझं नोकरी सोडणं आणि असं फिरायला जाणं त्यांना पटलं नव्हतं. पण कोणी मला तसं बोलून दाखवलं नाही.ताईची छोटी मुलगी भक्ती म्हणाली, ‘जाऊ दे ना मामा कुठं मणिपूरला जातोस फिरायला. घरी चल परत. आपण मस्त मजा करू!’ मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. थोड्या वेळानं कांचन म्हणाली, ‘मामा चांगला जॉब कर. आपण खारघरमध्येच घर घेऊ आणि तुला मामी आणू!’...आता मात्र मला गुदगुल्या होत होत्या. मी हो म्हणणार एवढ्यात मुंबई-कोलकाता हावडा मेल लवकरच येत असल्याची अनाऊन्समेण्ट झाली. क्षणभर मन बेचैन झालंच. नवस करून लोकांना मुंबईत लॉटरीत सिडकोचं घर लागत नाही. मला लागलं होतं. सुरुवातीला भरता येतील एवढे पैसेही बँकेच्या अकाउण्टमध्ये होते. बरोबरच्या मित्रांची लग्नं होऊन त्यांना मुलंबाळंही झाली होती...आणि मी असा फिरायला, जग पाहायला निघालो होतो. लोक आयुष्यात जुगार खेळतात. मी आयुष्यच जुगारात लावायला निघालो होतो. तेवढ्यात गाडी आली आणि मी निघालो. आईनं मला एक नियम सांगितला होता, आयुष्यात एकदा पाऊल पुढे टाकलं की मागे पाहायचं नाही.मी टाकलं होतं पाऊल पुढं. जग पाहायला निघालो. पत्रकार म्हणून एका इंग्रजी वृत्तपत्रात काम करत होतो, त्यावेळची गोष्ट. कमांडर दिलीप दोंडे समुद्रमार्गे पृथ्वी प्रदक्षिणा करून आले होते. असा पराक्र म करणारे ते पहिलेच भारतीय आणि सहावे आशियाई नागरिक. मोहीम फत्ते करून आले म्हणून मला त्यांची मुलाखत घ्यायला सांगण्यात आलं. मी गेलो. निघताना मी त्यांना विचारलं, ‘तुमच्यासारखं मलाही करता येईल?’

ते हसले आणि म्हणाले, ‘धिस इज रिस्की अ‍ॅण्ड डेंजरस बट नॉट इम्पॉसिबल. शो युअर सिन्सॅरिटी अ‍ॅण्ड द वर्ल्ड विल हेल्प यू!’तेव्हापासून माझ्या मनात जग पाहायला जायचं हे स्वप्न रु जलं.वाटलं आणि निघालो असं काही झालं नाही. ६-७ वर्षे गेली. मी पत्रकार म्हणून काम करतच होतो. एकदा आजारी पडलो. सुटी घेतली महिनाभर. बरं वाटल्यावर थोडं फिरून आलो. पण आॅफिसला जावंसं वाटेना. मग अजून महिनाभर सुटी घेतली. म्हणता म्हणता तीन महिने सुटी झाली. आणि एक दिवस मी आॅफिसला कळवून टाकलं. माझा राजीनामा. नोकरी सोडली. आय अ‍ॅम फ्री टू ट्रॅव्हल!ठरवलं, आता निघायचं जग पाहायला. तयारी करून, घरच्यांशी बोलून १९ मार्च २०१६ रोजी निघालो.तो दिवस आणि आज हे तुम्हाला सांगतोय तो दिवस, मी अखंड प्रवासातच आहे.आज हे सांगतोय तेव्हा माझ्या प्रवासाचा ७४९ वा दिवस उजाडलेला आहे. मध्य अमेरिकेतल्या जगाच्या नकाशावरही न दिसणाऱ्या मेक्सिकोजवळच्या होण्डुरास नावाच्या देशातून ही माझ्या प्रवासाची गोष्ट सांगतोय.कसे गेले हे ७४९ दिवस?एका वाक्यात सांगायचं तर, मजा आली. नाही म्हणायला एखादा सण असतो, किंवा एखाद्या दिवशी खूप भूक खवळते त्याक्षणी वाटतं की आता बास, जावं घरी परत. पण ते तेवढंच. सायंकाळी-रात्री वाटतंही कधीतरी एकेकटं, पण तेही वाटणं साहजिक आहे. मायेच्या माणसांची आठवण येते. पण दिवस उजाडला की नवीन माणसं, नवीन जग माझी वाट पाहत असल्यासारखी भेटतात. मग मला त्या हाकेच्या दिशेनं जावंच लागतं. दिवसा मी प्रवासात असतो, कुणाकुणाला भेटत असतो, गप्पा मारतो, नवनव्या जागा पाहतो. पण माझं ‘शेड्युल’ असं काही नाही. मी तीन दिवसांपेक्षा जास्त दिवसांचं प्लॅनिंगच करत नाही. पुढं काय, भविष्यात काय हे प्रश्नच माझ्या आयुष्यातून संपलेत. कुठलाही प्लॅन तीन दिवसांचा. आणि जास्तीत जास्त प्लॅनिंग म्हणजे पुढच्या देशाचा व्हिसा मिळवण्यासाठी करावी लागणारी धावपळ. बाकी प्लॅनिंग शून्य. प्लॅनिंग लागतंय कशाला? आपण अंधारात निघतो, हातात टॉर्च घेऊन. इटुकला, पावलापुरता प्रकाश असतो. दहा-बारा पावलं पुढचं दिसतं, आपण नीट पुढं जातो. मग फार पुढचं दिसायलाच पाहिजे, ही घाई तरी कशाला?

या प्रवासात माझ्या हे लक्षात आलंय की फार प्लॅनिंग काही कामाचं नाही. प्लॅन वर्क आउटच होत नाहीत. आपण फार प्लॅनिंग करतो, नी ते प्रत्यक्षात उतरत नाही म्हणून दु:ख होतं. त्यापेक्षा फार लांबचं, फार पुढचं असं काही न ठरवता, छोट्या प्लॅनने मोठ्या गोष्टी घडल्या की आनंद होतो. जे हवं ते मिळालं, जे माहितीच नव्हतं तेही मिळालं, आपण खूश! मस्त वाटतं. मी असा होतो का, मुंबईत? पत्रकार म्हणून जगताना तर केवढं प्लॅनिंग. केवढी मिन्टामिन्टाची लढाई. दिवस उजाडला की सगळ्यांचं सगळं ठरलेलं असतं. त्यात नवीन काही करायला उसंत मिळतच नाही. मीही अशाच घड्याळाला लटकलेलो होतो. ते घड्याळ मागे ठेवून निघालो तर सुरु वातीला एक मोठी पोकळी जाणवली. रोज दिवस उजाडला की रिकामा, त्यात भरायचं काय? त्या पोकळीचं करायचं काय?पण मग हळूहळू त्या पोकळीची जादू कळली, त्यात रंग दिसले. मी प्रवासाला लागलो,

नवीन लोकांशी बोलू लागलो. मित्र होऊ लागले, आणि मग प्लॅन नसलेलं हे आयुष्य जास्त ‘आॅफर’ करायला लागलं. प्लॅनिंगवालं आयुष्य हे माझं रु टीन होतं, आता अनप्लॅन्ड लाइफ हेच माझं रु टीन आहे. मला मान्यच आहे की, हे सारं इतकं सोपं-सहज घडलं नाही. सुरुवातीला तर खूप त्रास झाला. सगळ्यात मोठा मुद्दा होता जेवणाखाणाचा. मी पूर्ण शाकाहारी. मणिपूरला पोहचलो. तिथं काही दोस्त भेटले. त्यांनी मांसाहार करण्याचा आग्रह केला. त्यांचं मन कसं मोडणार म्हणून खाल्लं. पण पोटात डचमळलं. कसंतरी व्हायला लागलं. गावात डॉक्टरही नाही. शेवटी आईला फोन केला. ती म्हणाली गरम पाण्यात मीठ घालून उलट्या कर. केल्या उलट्या, सगळं बाहेर पडलं. त्यादिवशी मी ठरवलं, ‘नाही’ म्हणायला शिकायचं. नाही म्हणताच येत नव्हतं. याला काय वाटेल, तो काय म्हणेल, लोक काय म्हणतील या साऱ्यात जगणं बांधलेलं होतं, ते इथं खुलं झालं. जे ‘नको’ त्याला नाही म्हणायला शिकलो. आज इतके दिवस मी फिरतोय, शाकाहारी राहूनही उत्तम साधलं मला हे भटकणं.मग खातो काय?मी ज्या देशात जातो त्या देशातली स्थानिक फळं मिळतात. ती स्वस्तही असतात. तांदूळ, गाजर-टोमॅटो कुठंही मिळतात. अर्धा किलो तांदूळ आणायचे, जिथं असेल तिथं मिळेल त्या सामानात मस्त स्वयंपाक करून खातो. सोबतीच्या दोस्तांनाही खिलवतो. मस्त बेत जमतो.किती सोप्या असतात गोष्टी, सहज सोप्याही होतात. मी मणिपूरहून निघून मलेशिया मार्गे आॅस्ट्रेलिया, तिकडून ब्राझील ते आता मध्य अमेरिकेत पोहचलोय. जागोजागी चांगली माणसं भेटली. मी पत्रकार म्हणून काम करायचो तेव्हा मुंबईत राजभवनात उमेश काशीकर नावाचे पीआरओ होते. ते मला एकदा म्हणाले होते, जिथं माणूस असतो ना, तिथं माणुसकी असतेच. हे वाक्य गेले सातशेहून अधिक दिवस मी प्रत्यक्ष जगतोय. फक्त इतरांकडून माणुसकीची अपेक्षा करताना आपल्याला आधी माणुसकी दाखवावी लागते. या साºया प्रवासात मी शेकडोवेळा अपरिचित लोकांसोबत राहिलो, त्यांच्याकडे जेवलो. फेसबुकवर पोस्ट टाकत राहिलो की, मी अमुक भागात आहे, त्याठिकाणी आहे का कुणी मित्र. तर अनेकांनी आपल्या मित्रांशी मला जोडून दिलं. त्यांच्या मित्रांकडे राहिलो. भाषा येत नसते तरी लोक आपल्याशी प्रेमाच्या भाषेत बोलतात हे पुन्हा पुन्हा अनुभवलं. मी कोलंबियात दोन महिने एका कुटुंबासोबत राहिलो. ते शिक्षक होते. त्यांच्यासोबत मी मुलांना शाळेत शिकवायला जायचो. योगासनं शिकवायचो, गणित शिकवायचो. वर्गात फक्त चार मुलं होती. मला वाटायचंही की एवढ्या कमी मुलांना काय शिकवणार? मात्र ते शिक्षक अत्यंत प्रेमानं या मुलांना शिकवायचे. आपण काय करायचं हे आपण ठरवू शकतो, तसं वागू शकतो हे महत्त्वाचं अन् ते मी इथं शिकलो.

असाच अनुभव चीनमध्ये आला, तसा आॅस्ट्रेलियातही. आॅस्ट्रेलियाहून चिलीला जाण्याचं माझं विमान तिकीट एका विमान कंपनीनं मोफत दिलं. आॅस्ट्रेलियात तर एका कुटुंबानं प्रेमानं माझा खर्च केला. टाटा ट्रस्टला माझ्या एका मित्रानं माझ्या या फिरस्तीचा तपशील पाठवला तर त्यांनी मला पाच लाख रु पये दिले. त्याबदल्यात काय हवं असं विचारलं तर म्हणाले, काही नाही. यू आर फ्री टू ट्रॅव्हल, हेच महत्त्वाचं आहे.हे फ्री टू ट्रॅव्हल असणं किती मोठं आहे, माझ्यासाठी. जिथं जमीन नाही किंवा ज्या देशाचा व्हिसाच मिळाला नाही त्यापलीकडच्या देशात फक्त विमानानं गेलो. बाकी मी रस्त्यानं, जमिनीवरूनच प्रवास करतोय. व्हिसा मिळाला नाही तर शांतपणे अनेक दिवस व्हिसा मिळण्याची वाट पाहतो, थांबतो. पण माघार घेत नाही. हे थांबणं, वाट पाहणं तरी कुठं होतं माझ्यात? मुंबईत पत्रकार म्हणून पळणारा मी आणि आज प्रवास करत फिरणारा मी यांच्यात गेल्या सातशेहून अधिक दिवसांत किती फरक झालाय, हे पाहिलं की माझं मलाही नवलच वाटतं.

मी मुळात फार उतावळा होतो. अ‍ॅग्रेसिव्हही. जे हवं ते हवंच आणि आज, आत्ता, लगेच हवं अशा अ‍ॅटिट्यूडनं जगायचो. कुणावर सहजी विश्वास ठेवायचो नाही. पत्रकारितेचा व्यावसायिक गुण प्रत्यक्ष जगण्यातही उतरला होताच. कुणी काहीही माहिती दिली, अगदी घरातल्या माणसांनीही काही सांगितलं तरी मी ते क्र ॉस चेक करून घ्यायचो. नवख्या माणसांवर विश्वास ठेवणं तर फार लांबची गोष्ट होती.आता मी कुणावरही, अगदी कुणावरही विश्वास ठेवू शकतो. सहज.शांत झालोय. कुणी माझ्यावर आरडलं तरी मी शांत राहतो. स्वत:लाच सांगतो की, ‘लेट हिम कुल डाऊन’ मग बोलू. काहीच प्रतिक्रि या देत नाही. हे प्रतिक्रिया न देणं माझ्या आयुष्यातच नव्हतं. ते मी शिकलोय.पेशन्स नावाची गोष्ट शिकलो. तो नव्हताच माझा. मला जे हवं ते याक्षणी हवं हा माझा अ‍ॅटिट्यूडच संपला. उदाहरण सांगतो, निकारागुआ नावाच्या एका इटुकल्या देशाचा व्हिसा मला मिळत नव्हता. मी किती तरी दिवस प्रयत्न केले. त्या देशाचा व्हिसा मिळेल म्हणून त्या शेजारच्या देशात ५३ दिवस वाट पाहत थांबलो. पुणे जिल्ह्याएवढासुद्धा नाही तो देश. मित्र म्हणालेही की, जा विमानानं पुढं, कशाला थांबतो. पण मला त्या जमिनीवर जायचंच होतं. ५३ दिवसांनी मिळाला व्हिसा, गेलोच.हे इतकं वाट पाहणं मी शिकलोय.. तेही शांतपणे!ही शांतता इतकी अंगात मुरली की, दोनदा हल्ला झाला. सगळे पैसे चोरीला गेले, मानेवर चाकू ठेवून सारे पैसे, सामान पळवलं गुंडांनी. तरी मी शांत राहिलो.पण या दोन घटना अपवाद.बाकीचं जग सारं प्रेमानं भरलेलं, भारलेलं आहे..अमेरिका आणि युरोपचा व्हिसा वेळेत मिळाला तर सारं जग पाहून पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत येईनही मी घरी..घरही वाट पाहतं आहेच..

जगप्रदक्षिणेला कधी निघालास?

१९ मार्च २०१६आजवर किती देशांत गेलास?१७कोणकोणते देश फिरलास?म्यानमार, थायलण्ड, लाओस, व्हिएतनाम, चीन, आॅस्ट्रेलिया, चिली, अर्जेण्टिना, ब्राझील, बोलिविया, पेरु, इक्युडोर, कोलंबिया, कोस्टा रिका, निकारागुआ, होण्डुरास.किती भाषा कानावर पडल्या, तोडक्यामोडक्या बोललास?इंग्रजी, म्यानमार, थाई, लाओस, व्हिएतनीज, चिनी, स्पॅनिश.सामान किती आहे तुझ्यासोबत?एकूण ३ बॅग्ज आहेत.* पर्स - जिला मी अल्फा म्हणतो. ज्यात पासपोर्ट, एटीएम कार्ड, पैसे, लॅपटॉप, नोटबुक, टुथब्रश, पेस्ट, टॉयलेट पेपर हे अत्यावश्यक सामान असतं.*डे पॅक - ८ किलो वजन. कपडे, रेनकोट, गरजेचं सामान. इमर्जन्सी १० डॉलर कॅश.* १४ किलोची बॅग - कॅम्पिंग गिअर्स, गरम कपडे, पुस्तके, ट्रॅमर, मोठी प्लॅस्टिक बॅग, या तिन्ही बॅगा ठेवता येतील अशी स्लिपिंग बॅग.- असं सगळं मिळून एकूण २४ किलो वजन असतं सोबत. माझा एक आर्मीतला डॉक्टर मित्र म्हणतोय ते कमी करून १८किलो कर. पण ते जमलेलं नाहीये अजून.या प्रवासात ‘भारी’ असं काय वाटलं आजवर?मी खूप दमून कुठंतर पोहचतो तेव्हा कुणीतरी सहज पाण्याचा ग्लास आणून देतं मला स्वत:हून, ते सुख. त्याहून भारी काही नाही.अपरिचित माणसांकडे राहतो, निरोप घेताना ते घट्ट मिठी मारतात, काळजी घे म्हणतात, त्यावेळी डोळ्यातून पाणी येतं, तेही भारी. सुखच!खटकलं असं काही..?माझ्याच मनाचा चाळा. चुकून कधीतरी वाटतंच दोन वर्षे आपण अशी नुस्ती फिरण्यात घालवली, हा बावळटपणा तर ठरणार नाही.. नसेल?

( विष्णुदास मुळचा मराठवाड्यातल्या....चा, सध्या जगभ्रमंतीवर आहे. हा लेख लिहिला तेव्हा तो होण्डुरास नावाच्या देशात होता. wishnew27@gmail.com )

टॅग्स :tourismपर्यटनJournalistपत्रकारTravelप्रवास