(Image Credit : en.wikipedia.org)
आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा ठिकाणाबाबत सांगणार आहोत, जिथे परदेशातून लोक तेथीत डोंगरांचं सौंदर्य बघण्यासाठी आणि तेथीत शांतता अनुभवण्यासाठी येतात. हिमाचल प्रदेश म्हटला की, लोक कुल्लू, मनाली, धर्मशाला इथपर्यंतच मर्यादित राहतात. पण त्यापलिकडेही हिमाचल अधिक सुंदर आहे. हे ठिकाण आहे 'करसोग'.
'करसोग' हे ठिकाण मंडी जिल्ह्यात येतं. पण मंडीपासून हे ठिकाण १२५ किमी दूर अंतरावर आहे. करसोगला जाताना तुम्हाला सफरचंद, नाशपाती, देवदार अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडेही बघायला मिळता. करसोग तर सोडाच तिथे जाण्याचा रस्ताही तुम्हाला मोहिनी घालेल इतका सुंदर आहे.
(Image Credit : en.wikipedia.org)
या रस्त्याची सर्वात चांगली बाब ही आहे की, दुसऱ्या रस्त्यांप्रमाणे या रस्त्यावर जास्त गर्दी नसते. करसोगला पोहोचताच बर्फाने झाकले गेलेले डोंगर आणि तेथील हिरवळ पाहून मनाला वेगळ्याच विश्वात आल्याचा अनुभव होतो. जर तुम्हाला काही वेळ शांततेत आणि चांगल्याप्रकारे घालवायचा असेल तर या ठिकाणाहून चांगलं ठिकाण क्वचितच असेल.
(Image Credit : en.wikipedia.org)
४ हजार ५०० फुटावर असलेल्या करसोग घाटाशी संबंधित अनेक वर्ष जुनी एक कहाणी आहे. या ठिकाणाचं नाव दोन शब्दांपासून तयार झालं आहे. एक म्हणजे 'कर' तर दुसरा 'सोग'. याचा अर्थ होतो 'प्रतिदिन शोक'. महाभारताशी संबंधित या कथेबाबत सांगितलं जातं की, या गावात एका राक्षसाने गोंधळ घातला होता. तो दररोज गावातील लोकांना खात होता. त्यामुळे गावात शोककळा पसरली होती. भीमाने त्या राक्षसाला मारून गावातील लोकांची रक्षा केली होती.
या गावातील लोकसंख्याही फार नाही. इथे फिरण्यासाठी तुम्ही कमरूनाग मंदिर, शिखरी देवी मंदिर, कामाक्षा देवी आणि महुनाग मंदिरातही जाऊ शकता. त्यासोबतच इथे एक ममलेश्वर मंदिर आहे. या मंदिराचा संबंध पांडवांशी असल्याचं सांगितलं जातं. असे म्हटले जाते की, इथे पांडव काही काळ राहिले होते.
(Image Credit : traveltriangle.com)
ममलेश्वर मंदिरात एक ढोल ठेवला असून हा ढोल भीमाचा असल्याचं बोललं जातं. मंदिरात पाच शिवलिंग आहेत. तसेच इथे २०० ग्रॅमता एक गव्हाचा दाणाही आहे. हा पांडवांचा मानला जातो. जर तुम्हाला ट्रेकिंग पसंत असेल तर करसोगपासून २२ किमी अंतरावर दूर रोहांडाला जाऊ शकता.