अनेक संस्कृती आणि विविधतेने नटलेल्या भारतात राहूनही तुम्ही जर हिमाचल प्रदेशातील खास ठिकाणांना भेट दिली नसेल मग सर्व व्यर्थच... आज आम्ही तुम्हाला अशाच एक हिमाचलमधील सुंदर ठिकाणाबाबत सांगणार आहोत. त्याचं नाव आहे 'चंबा'. हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण फिरण्यासाठी फार सुंदर आहे. जर तुम्हीही एखाद्या हटके ठिकाणाच्या शोधात असाल तर यावेळी चंबा उत्तम पर्याय ठरेल.
मनाचा ठाव घेणारं चंबामध्ये निसर्गसौंदर्यासोबतच तुम्हाला शांतता अनुभवता येईल. असं म्हटलं जातं की. चंबा शहराचं नाव तेथील राजकुमारी चंपावतीच्या नावावरून पडलं आहे. याबाबत येथील स्थानिक लोक एक गोष्टही सांगतात. असं सांगण्यात येत की, राजकुमारी शिकण्यासाठी दररोज एका साधुच्या आश्रमात जात असे. यामुळे राजाच्या मनात संशय निर्माण झाला. त्यासाठी एका दिवशी राजा राजकुमारीचा पाठलाग करत आश्रमात गेला. तथे त्याला कोणीच भेटलं नाही पण त्याला संशय करण्यासाठी शिक्षा मिळाली. राजाकडून त्याची मुलगी हिरावून घेण्यात आली. आकाशवाणी झाली आणि आपल्या चुकीचं प्रायश्चित करण्यासाठी राजाला त्याठिकाणी मंदीर बनवण्यास सांगण्यात आलं. राजाने तिथेच चौगान मैदानाजवळ एक सुंदर मंदिर तयार केलं. चंपावती मंदिराला येथील स्थानिक लोक चमेसनी देवीच्या नावाने ओळखतात.
चंबाचं सौंदर्य वाढवतं चौगान
चंपावती मंदिराच्या समोर एक विशाल मैदान आहे. ज्याला चौगान असं म्हटलं जातं. एकेकाळी चौगान फार मोठं मैदान म्हणून ओळखलं जात असे. परंतु त्यानंतर या मैदानाचे पाच हिस्से करण्यात आले. मुख्य मैदानाव्यतिरिक्त येथे चार छोटी मैदानं आहेत. चौगान मैदानात प्रत्येक वर्षी चंबामधील प्रसिद्ध पिंजर जत्रा भरवण्यात येते. चंबाच्या आजूबाजूला जवळपास 75 प्राचीन मंदिरं आहेत. या मंदिरांमध्ये प्रमुख लक्ष्मीनारायण मंदिर, हरिराय मंदिर, चामुंडा मंदिर आहे.
भूरी सिंह संग्रहालय
कोणत्याही शहराचा इतिहास समजून घेण्यासाठी तिथे असलेलं म्युझिअम नक्की पाहावं. चंबामध्येही भूरी सिंह संग्रहालय आहे. हे म्युझिअम छोटं असलं तरिही येथे तुम्हाला अनेक सुंदर गोष्टी पाहायला मिळतील. म्युझिअमच्या पहिल्या मजल्यावर मिनिएचर पेंटिंग्सची सुंदर गॅलरी आहे. यामध्ये गुलेर शैलीपासून तयार करण्यात आलेली पेंटिंग तयार करण्यात आलेली आहे. तसेच येथे चंबा शहराचे दुर्मिळ फोटोही पाहायला मिळतील.
कालाटॉप अभयारण्य
डलहौजी आणि खजियारच्या रस्त्यामध्ये एका डोंगरावर आहे हे अभयारण्य. याच्या चारही बाजूला शांत वातावरण आहे. हिरवळीमध्ये वसलेलं कालाटॉप अभयारण्य फार सुंदर आहे. येथे तुम्ही ट्रेकिंगही करू शकता. तसेच येथे तुम्हाला विविध पक्षांच्या प्रजाती पाहायला मिळतील. तसेच येथून वाहणाऱ्या रावी नदीचं सौंदर्य पाहणं फार सुंदर असेल.
चंबामध्ये शॉपिंग
हिमाचलमध्ये कुल्लू येथील शॉल फार प्रसिद्ध आहेत, अशातच चंबा येथील शॉलही प्रसिद्ध आहेत. चंबा शहरामध्ये फिरताना तुम्ही चंबामध्ये अनेक सुंदर गोष्टी खरेदी करू शकता.
कसे पोहोचाल?
चंबापासून सर्वात जवळ विमानतळ पठाणकोट आहे. जे चंबापासून 120 किलोमीटर दूर आहे. तिथपासून तुम्ही बस किंवा टॅक्सीने चंबाला पोहचू शकता. पठाणकोट रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर तिथून पुढील प्रवास बस किंवा टॅक्सीने करू शकता.