हिवाळ्यात जर तुम्हाला फिरायला जायचं असेल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील एका खास ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. ज्याठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला खूप आनंद होईल. मुंबईपासून अगदी काही अंतरावर असल्यामुळे तुम्हाला जर या ठिकाणी जायचं असेल तर जास्त खर्च करावा लागणार नाही. कमीतकमी खर्चात तुम्ही या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला वेळ नसेल तर एका दिवसात सुद्धा तुम्ही या ठिकाणी फिरू शकता.
पुणे-नगर रस्त्यावर शिरूर, शिक्रापूर जवळ हे पर्यटन स्थळ आहे. अष्टविनायकापैकी रांजणगाव गणपतीपासून साधारण २३ किमी अंतरावर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणचे आकर्षण मोर आहेत. या गावाचे नाव चिंचोळी असं आहे. सध्याच्या काळात आपण पाहत आहोत की सगळ्याच ठिकाणी प्राण्यांमध्ये जैवविविधता कमी होताना दिसून येते. पण या चिंचोळी पर्यटन स्थळात मोर आढळण्यामागे कारण आहे.
चिंचोली गावातील मोर पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. चिंचोलीतील उत्तम जैववैविध्यामुळे पूर्वीपासूनच येथे मोर मोठ्या संख्येने वास्तव्यास होते. दिसायला अत्यंत देखणा, आकर्षक असलेला हा पक्षी देवाचे वाहन असून, आपल्या गावाचे वैभव आहे, अशी गावातील पूर्वजांची समजूत होती. त्यामुळे त्यांनी कधीच गावातील मोरांची शिकार केली नाही. उलट मोरांचा अधिवास टिकून राहावा, यासाठी त्यांनी शेताभोवती मोरांना आकर्षित करणारी झाडे लावली.
या पर्यटन स्थळातील लोकांनी घरातल्या पाळीव प्राण्याला सांभळतात. त्याच पद्धतीने मोरांसाठी पोषक वातावरण निर्माण केले. ही प्रथा पुढे चालत राहावी, यासाठी त्यांनी पुढच्या पिढीवर मोरांचा आदर करावा, असे संस्कारही केले. आज या गावात दोन ते अडीच हजार लोकवस्ती असून तेवढ्याच संख्येने मोर वास्तव्यास आहेत. तुम्ही या ठिकाणी कधीही जाऊ शकता पण जर तुम्ही पावसाळ्यात या ठिकाणी गेलात तर मोर पाहण्याची मजा काही निराळीच आहे. सकाळी ६.०० ते सकाळी ८.०० व संध्याकाळी ५ ते ७ ही मोर पाह्ण्यासाठीची उत्तम वेळ आहे. निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला खूप इंजॉय करता येईल. या ठिकाणी आंब्याच्या आणि सिताफळाच्या बागासुद्धा तुम्हाला पाहता येतील.