आग्र्यापासून जवळपास ४० किमी अंतरावर ऐतिहासिक शहर फतेहपुर सीकरी आहे. या शहराची निर्माण बादशाह अकबरने केलं होतं. अकबरने सीकरीला आपली राजधानी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या दृष्टीकोनातूनच त्याने इथे भव्य किल्ला बांधला होता. १५७३ मध्ये येथून तो गुजरातवर विजय मिळवण्यासाठी गेला होता. गुजरातवर विजय मिळवून आल्यावर त्याने सीकरीचं नाव फतेहपुर(विजयी नगर) असं ठेवलं. तेव्हापासून या शहराला फतेहपुर सीकरी असं नाव पडलं आहे.
नौबत खाना
येथील नौबत खाना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. हा मुघल शैलीतील एक ड्रम हाऊस आहे. जिथे शहनाई आणि ड्रमचं प्रदर्शन केलं जातं होतं. इथे दिवसातून पाच वेळा ढोल वाजवले जात होते. तसेच येशील लाग भींतींवर करण्यात आलेलं नक्षीकामही चांगलं लोकप्रिय आहे.
बुलंद दरवाजा
येथील बुलंद दरवाजाही चांगलाच प्रसिद्ध आहे. गुजरातवर विजय मिळवल्यावर हा बांधण्यात आला होता. लाल बलुआ दगडाने हा दरवाजा तयार करण्यात आला आहे. तसेच याच्या आत पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या संगमरवरीने नक्षीकाम करण्यात आलं आहे.
पचीसी न्यायालय
बुद्धीबळासारखा खेळला जाणारा हा खेळ तुम्हाला माहीत असेलच. पण फतेहपुर सीकरीमध्ये एक न्यायालय आहे. इथे सम्राट अकबर शतरंज खेळत होते.
पंचमहल
पंचमहलची पाच मजली इमारत भव्य आहे. या महलाचा वापर बादशाह सायंकाळी फिरण्यासाठी किंवा रात्री चांदण्यांचा आनंद घेण्यासाठी करत असत. या महलाची खासियत म्हणजे यात १७६ खांब आहेत, त्यांच्या आधारेच ही इमारत उभी आहे. प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या कलाकृती करण्यात आल्या आहेत.
मरियम-उज-जमानी पॅलेस
मरियम-उज-जमानी पॅलेस हा फतेहपुर सीकरीच्या मुख्य किल्ल्याच्या परिसरात आहे. हा एक सुंदर मुघल थीम असलेला महल आहे. असे म्हटले जाते की, अकबराची हिंदू पत्नी जोधा बाई इथेच राहती होत्या. या महलात फार सुंदर बागाही आहेत.
इबादत खाना
फतेहपुर सीकरीमध्ये असलेला इबादत खाना चांगलाच लोकप्रिय आहे. याला आराधना(पुजेचं) घरही म्हटलं जातं. इथेच सुन्नी मुस्लिम चर्चा करण्यासाठी एकत्र येत होते.