इंडोनेशियातील सर्वात शानदार आणि सांस्कृतिक शहरांच्या यादीत बाली हे शहर टॉपला आहे. मनसोक्त फिरण्याचा आनंद घेणा-यांसाठी बाली हे सर्वात चांगलं ठिकाण मानलं जातं. फॅमिली ट्रीप, हनीमून, सिंगल ट्रीपसाठी हे शहर परफेक्ट डेस्टिनेशन आहे. इथे आल्यावर तुम्ही इतरही शहरांची सैर करु शकता. कारण इथे येण्यासाठी 1 महिन्यांचा व्हिसा फ्रि आहे.
श्रीमंत बनवणारी करन्सी
भारत आणि इंडोनेशियन करन्सीमध्ये मोठा फरक आहे. इथे भारतीय पर्यटक श्रीमंत झाल्याचं फील करतील. कारण तिथे भारतीय 471 रुपयांच्या बदल्यात 1,00,000 इतके रुपये मिळतात. इथे रुपयाची किंमत कमी आहे आणि बाकी सगळं महाग आहे.
छोटे आयलंड
बाली सोबतच इंडोनेशियातील छोटे छोटे आयलंड चांगलेच प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला कधी न अनुभवलेली शांतता मिळेल. इथे सर्वात खास आहे गिली आयलंड. स्पीड बोटने इथे जाण्याची व्यवस्था आहे. एका तासात तुम्ही इथे पोहचाल.
बालीचं हार्ट कूटा
कूटा, सेमिनाक आणि झिम्बारन दक्षिण मुंबई बालीतील लोकप्रिय जागा आहेत. कूटा हे शहर बालीचं हार्ट आहे. येथील शानदार हॉटेल्स आणि ट्रेंडी फॅशन स्टोर्स तुम्हाला भरपूर आनंद देतील. दोन्ही जागा ऐकमेकांपासून 3 किमी दूर आहेत.
आणखी काय खास?
इंडोनेशियातील हिल स्टेशन उबूद बालीपासून केवळ 35 किमी दूर आहे. हा परीसर भाताच्या शेतांनी वेढलेला आहे.