- केतकी करंदीकर
तीन देशांतल्या चार शहरांत राहणाऱ्या एकूण आठ मैत्रिणी. मोठ्या प्रयत्नाने त्यांनी एका ट्रीपवर जायचं ठरवलं आणि आठ दिवस स्पेनच्या सहलीला गेल्या! ‘जिंदगी ना मिलेगे दोबारा’मध्ये मुलांनी केलेली मजा आठवते? - या मुलींनी त्यांच्याहून भारी मजा केली. कसं जमलं त्यांना हे?... खरं म्हणजे आपणच म्हणालो होतो की नाही, आपण एक लेख लिहायला पाहिजे आपल्या या अनुभवाबद्दल!..तर आज संधी आलीये’- आज हा लेख लिहायला घेताना मी सगळ्यांना मेसेज केला, सगळ्या परत ३ वर्ष मागे गेल्या..तीन वेगवेगळ्या देशात राहणार्या आठ मैत्रिणींनी एकत्र येऊन चौथ्याच देशात - आणि तेही स्पेनमध्ये- आठवडाभर मस्त मजा करायची!तर ही कल्पना कशी सुचली?आम्ही सगळ्या म्हणजे अनू, शलाका, आरती, अदिती, नंदिता, शिल्पा, हेमा आणि केतकी कॉलेजमधे बीसीएस ला एका वर्गात होतो. कॉलेज संपून २० वर्ष झाली तरी आधी ई-मेल, याहु ग्रूप आणि नंतर व्हॉट्सअॅप, फेसबुकवरून जास्त मैत्रिणी झालो. सगळ्या वेगवेगळ्या देशात विखुरलेल्या पण निमित्तानिमित्ताने पुण्यात भेटत राहिलो. अशातच एकदा अदिती कामानिमित्त इंग्लंडला गेली असताना शलाकाकडे गेली होती. त्यांच्या बोलण्यात विषय निघाला की आपण सगळ्यांनी मिळून कुठेतरी जाऊया. हा धागा पकडून ती परत आल्यावर आमच्या गप्पा रंगल्या आणि आम्ही खरंच याचा विचार करू लागलो.दोघी जणी अमेरिकेत, एक इंग्लंडमध्ये, बाकी पाच पुण्यात. कोणालाच फार जास्त प्रवास करावा लागू नये म्हणून युरोपला जाण्याचा विचार केला. मजा पण येईल आणि सगळीकडे हिंडता येईल असं ठिकाण हवं होतं. मग ‘स्पेन’वर एकमत झालं. ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या सिनेमानं सगळ्यांना भुरळ पाडली होतीच. मार्च २०१४ च्या शेवटच्या काही दिवसात स्पेन हे ठिकाण आणि मे २०१५ हा मुहूर्त नक्की झाला.प्लॅनिंग सुरु..ई-मेल आणि व्हॉट्सअॅप वरून भरपूर चर्चा सुरु झाली. कुठे कुठे जायचं , काय बघायचं वगैरे. आरतीनी रिक स्टिव्हजचं स्पेनबद्दलचं एक ट्रॅव्हल गाईड घेतलं, कोणी स्पेनला जाऊन आलेल्या मित्र-मैत्रिणींना विचारलं , कोणी इंटरनेटवरून माहिती शोधली, असा सगळ्यांनी आपापला रिसर्च चालू केला. एक मात्र सगळ्यांचं पक्कं ठरलं होतं की आमचं आम्ही सगळं ठरवायचं आणि आमचं आम्हीच जायचं , कुठल्याही टूर कंपनी बरोबर जायचं नाही. सगळ्याच जणी भरपूर प्रवास केलेल्या असल्यामुळे तो अनुभव पाठीशी होता.अधून मधून चर्चा थंडावली की कोणीतरी परत ती ठिणगी पेटवायचो. फेसबुकवर आमचा झेडएनएमडी असा एक ग्रुप बनवला आणि जे जे महत्वाचं वाटेल ते त्यावर टाकू लागलो. सगळ्यांचे वेगळे वेगळे टाइम झोन सांभाळून एक वेळ ठरवली त्यावेळी पहिला एक कॉन्फरन्स कॉल केला जुलै २०१४ मधे. बहुतेक सगळ्याच सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करत असल्यामुळे किंवा आधी केलेलं असल्यामुळे हे मस्त जमतं आम्हाला. तीन देश - भारत, अमेरिका आणि इंग्लंड. चार शहरं आणि आठजणी कॉन्फरन्स कॉलवर भेटलो आणि तारीख पक्की केली. सगळ्यांची मुलं वेगवेगळ्या वयाची, त्यांच्या शाळांच्या सु्ट्या, नवऱ्यांच्या सुट्ट्या (कारण आम्ही स्पेनला गेल्यावर तेच सगळं सांभाळणार होते), प्रत्येकीच्या आॅफिसच्या कामाच्या डेडलाईन्स वगैरे सगळं बघून तारीख ठरवणं काही सोप्पं काम नव्हतं पण तो पहिला महत्वाचा निर्णय झाला. घरी काय किंवा आॅफिसमधे काय हेच तर करत असतो!
व्हिसा, हॉटेल आणि फ्लाईट बुकिंगजानेवारी २०१५ मध्ये पुण्यातल्या सगळ्यांची विमानाची तिकिटं निघाली, आणि आता आमची ट्रिप खरंच होणार हे ठरलं. मग दर काही आठवड्यांनी कॉन्फरन्स कॉल व्हायला लागले आणि पटापट गोष्टी पुढे सरकत गेल्या. त्या कॉल्स मध्ये बाकी सगळ्या एकीकडे हॉटेलच्या किंमती , त्याचे रिव्ह्युज बघायचो आणि एकीचा स्क्र ीन आम्ही शेअर करायचो त्यावर , हॉटेलची सगळी बुकिंग करायचो. त्याचबरोबर सर्व बस, ट्रेन यांचीच बुकिंग्स नाही तर काय बघायचं त्या सर्व अट्रॅक्शन अणि फ्लॅमेन्को शो ची पण बुकिंग्स केली. एकदम मल्टिटास्किंग मास्टर्स.
गिरिकंद ट्रॅव्हल्स मुळे व्हिसाचं काम सोपं झालं. खर्चाचा हिशोब ठेवायला एक अॅप इन्स्टॉल केलं आणि अदितीनी ती जबाबदारी शेवटपर्यंत उत्तम पेलली. आम्ही तिची मर्जीही शेवटपर्यंत सांभाळली! कुठेही कोणाचं किती येणं आहे वगैरेबाबत गैरसमज नाही. प्रत्यकीकडे कॅश किंवा आपापलं मल्टिकरन्सी कार्ड आणि एक सगळ्यांचं मिळून कार्ड घेतलं ज्यात सगळ्यांनी पैसे घातले. सगळ्या अपार्टमेंट आणि हॉटेल्समधे शलाकानी फोन करून बुकिंग झाल्याची खात्री केली, अपार्टमेंटच्या किल्ल्या कुठे मिळतील याची माहिती काढली, तिथे नक्की काय काय सोयी आहेत हे विचारून घेतलं.ट्रिप सुरु ! माद्रिद आणि टोलेडोपुण्यातून शिल्पा, नंदिता, हेमा, अदिती आणि मी निघालो, मुंबई-दोहा-माद्रिद असा प्रवास करून ९ मे २०१५ ला माद्रिद एअरपोर्टवर शलाकाला भेटलो ! टॅक्सी बुक केली होती, दोन प्रीपेड सिमकार्ड घेतली आणि अपार्टमेंटवर पोचलो . आम्ही माद्रीदच्या रस्त्यांवरून एक चक्कर मरून येईपर्यंत आरती अपार्टमेंटवर पोचली होती आणि आम्ही आणलेल्या खाकर्यांवर तिने ताव मारायला सुरु वात केली होती. सगळ्यांना भूक लागली होती, परत बाहेर पडलो,patatas bravas आणि paella खाऊन परत आलो. दुसºया दिवशी सकाळी चहा करण्यासाठी जवळच्या दुकानातून सामान आणलं. सकाळी उठून चहा केला तेंव्हा लक्षात आलं की स्पॅनिशमधे साखरेला काय म्हणतात हे माहिती नसल्यामुळे आपण साखरेच्या ऐवजी मीठ आणलं आहे ! या अनुभवानंतर सगळीकडे काहीही विचारायचं असेल, विकत घ्यायचं असेल की लगेच फोन बाहेर काढून आधी गुगल ट्रान्सलेट वापरायला लागलो. माद्रिद मधल्या दुकानात खरेदीचा श्रीगणेशा झालाच, पहिल्याच दिवशी.दुसरा दिवस टोलॅडो मधे घालवला, माद्रिद वरून ट्रेननी प्रवास करून तिथे पोचलो, बसची टूर घेतली, तिथलं कॅथेड्रल पाहिलं, एका हातात भला मोठा सँडविच घेऊन खात खात तिथल्या अरु ंद गल्ल्या पालथ्या घातल्या, अर्थातच खरेदी केली आणि संध्याकाळी परत आलो.सेव्हिया१२ मे ला सकाळी लवकर उठून ताशी २०० कि.मी. वेगानी जाणा-या ट्रेनमधून सेव्हियाला गेलो. त्या प्रवासात सगळे कामाला निघालेले लोक होते, त्यांचे कपडे, केसाची स्टाईल, मेकअप, वगैरे सगळंच बघण्यासारखं , एकदम कडक!सेव्हियाला पण अपार्टमेंट बुक केलेलं होतं तिथे पोचलो, सामान ठेवलं आणि परत फिरायला निघालो. जेवण असंच एका रस्त्याच्या कडेला टेबलं लावलेल्या कॅफे मध्ये, त्याबरोबर थंडगार Sangria, आहाहा.. . त्यानंतर काहीजणींनी घोडागाडीमधून एक चक्कर मारली आणि परत अपार्टमेंटवर आलो तोपर्यंत अनू येऊन पोचली होती. तिची फ्लाईट रद्द झाली तर पठ्ठीनं आयत्यावेळी धडपड करून शोधून काढून एअरपोर्टवरून ट्रेन स्टेशनची बस पकडली, तिथून ट्रेननी आली, फ्लाईट पोचण्याच्याच वेळी पोचली! आहे की नाही भारी!संध्याकाळी Tapas आणि drinks रात्री बारा वाजता हेमाचा वाढदिवस साजरा केला आमच्या अपार्टमेंटच्या खालच्या कॅफे मधे! रात्री १२ वाजता तिथे हिंडताना अजिबात असुरक्षित वाटलं नाही. अर्थात, आमचं इतकं जोरजोरात बोलणं आणि हसणं चालू होतं की आमच्यापासून सगळे बहुतेक चार हात लांबच थांबले असावेत.दुस-या दिवशी Plaza de Espana, Army museum बघून एका पार्कमधे गेलो तिथे ६ लोकांनी पायानी सायकलसारखी चालवण्याची एक गाडी होती, त्यात सातजणींनी पार्कला फे-या मारल्या आणि आजूबाजूच्या लोकांची भरपूर करमणूक केली! ७-८र्षांच्या मुलींसारख्या हसत खिदळत होतो आम्ही, इतकी धम्माल आली.संध्याकाळी स्पेनचा प्रसिद्ध फ्लॅमेन्को डान्स चा एक तासाचा क्लास केला आणि नंतर शो बघितला.दुसºया दिवशीचं प्लँनिंग केलं कारण दुस-या दिवशी सकाळी निघून कार चालवत Granadaला जायचं होतं.
Sevilla ते Granada दोन गाड्या ताब्यात तर घेतल्या पण दोन्हीच्या जीपीएस मध्ये रस्ते वेगवेगळे दिसत होते! बराच वेळ त्याच्याशी झगडा केल्यावर लक्षात आलं की एकावर पोर्तुगल मधलं ग्रॅनडा दाखवत होतं! ते बरोबर केलं आणि निघालो, एक गाडी आरती चालवत होती, एक गाडी अनू. दोघी अमेरिकेत राहात असल्यामुळे उजव्या-डाव्या बाजूचा गोंधळ होणार नव्हता कारण स्पेनमधेही रस्त्याच्या उजवीकडूनच गाड्या जातात. पण दोघींची शाबास, न कंटाळता दिवसभर दोघींनी गाडी चालवली!व्हाईट हिल टाऊन्स बघत बघत जायचं होतं ग्रॅनडाला. इतकी गोड छोटी छोटी गावं आहेत ही सगळी, चित्रातल्यासारखी, सगळी घरं स्वच्छ पांढरी रंगवलेली, प्रत्येक घरात कुंड्यातून फुलांचे घोसच्या घोस ओसंडत होते, शांत रस्ते, छोटी दुकानं, सगळंच सुंदर! . Grazalema national parkमधून जाणारा रस्ता, दोन्ही बाजूंनी अप्रतिम निसर्गसौंदर्य , ते बघत Grazalema ला पोचलो. सगळं गाव दुपारची झोप काढत होतं, उगीच पुण्याला नावं ठेवतात सगळे. पण एके ठिकाणी आम्हाला जेवण मिळालं, जेवून थोडा वेळ हिंडून परत निघालो. Ronda ला थांबलो. खूप चाललो. जुना १८ व्या शतकात बांधलेला पूल बघितला..तिथून सरळ Granadaगाठलं रात्री ११ वाजता ट्रेन स्टेशनच्या मागे गाड्या परत केल्यावर दिवस संपला.लगेचच दुसर्या दिवशी शहरात हिंडून अल्हम्ब्रा नावाच्या ठिकाणी खूप वेळ भटकलो.शेवटचा दिवस१५ मे. आमच्या ट्रीपचा शेवटचा दिवस, सकाळी लवकर उठून बस पकडून परत माद्रीदला गेलो.तिथे ट्रेन स्टेशनमध्ये लॉकर्स असतात, त्यात सामान टाकून भटकायला निघालो. माद्रिदचा जगप्रसिध्द राजवाडा पाहून डोळे निवले. तिथूनmercado de san miguel नावाच्या एका प्रकारच्या मंडईमध्ये गेलो जिथे शेकडो प्रकारचे खाद्यपदार्थ, मासे, मांस, चीज, वाईन असे स्टॉल्स होते. चीज, वाईनची चव घेतली, काही ओळखूही न येणा-या प्राण्यांची डोकी आणि काही अवयव वगैरे ठेवलेले बघितले! पहिल्या दिवशी ज्या अपार्टमेन्टमधे उतरलो होतो तिथे जाऊन आलो कारण ते अनूने बघितलं नव्हतं. एअरपोर्टजवळच्या हॉटेलमधे बुकिंग केलं होतं. रूमवर जाऊन पॅकिंग( लेखन सहकार्य- आरती नेने, शिल्पा गोखले, अदिती दीक्षित)