- अमृता कदमप्रत्येक सुट्टीत काहीतरी वेगळं ट्राय करण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर क्रूझवर ट्रीप प्लॅन करायला काही हरकत नाही. पण क्रूझवर जाण्याच्या एक्साइटमेण्टमध्ये काही गोष्टी अजिबात विसरु नका. नाहीतर रसभंग होण्याची शक्यता आहे.
क्रूझसाठीची पूर्वतयारी1) क्रूझवर जाताना पॅकिंग करताना दोन बॅगमध्ये करा. एका बॅगमध्ये तुम्हाला आवश्यक असं सामान म्हणजे कपड्यांचे जोड, तुमची औषधं, थोडेफार पैसे, कागदपत्रांच्या फोटोकॉपी असं ठेवा. त्यामुळे समजा काही गोंधळ झाला, एखादी बॅग हरवली तरी विशेष काही अडचण येणार नाही.2) क्रूझवर जाताना कपड्यांची निवड अगदी काळजीपूर्वक करा. अगदी कुटुंबासोबत जरी क्रूझवर जात असाल तरी कपड्यांची योग्य निवड आवश्यक आहे. शिवाय सर्वांचे कपडे एकत्र नीट ठेवता येतील अशी एकच सुटसुटीत बॅग तयार ठेवा.3) तुम्हाला छान ड्रेसअप करायची हौस असेल तर क्रूझवरच्या नाइट पार्टीसाठी कुठला ड्रेस घालणार हे आधीच ठरवा. फॉर्मल सूटसोबत ट्राऊझर आणि त्यावर जॅकेट असं एखादं कॉम्बिनेशन जरूर असू द्या. शिवाय तुम्ही तुमच्या जोडीदारालाही याला मॅचिंग असं काहीतरी सुचवू शकता.3) क्रूझवर जास्त दिवसांसाठी जाणार असाल आणि कपडयांची संख्या थोडी कमी असेल तर तुम्हाला लॉन्ड्रीची गरज पडू शकते. क्रूझच्या रिव्हयू लिस्टमध्ये लॉन्ड्री सेवा मिळणार आहे की नाही याची एकदा खातरजमा करून घ्या. नाहीतर कपड्यांची पर्यायी व्यवस्था तयार असू द्यावी.4) तुम्ही बाहेर एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्हाला वॉशरु ममध्ये तुमच्या आवडीच्या ब्रॅण्डचं फेसवॉश, साबण, शाम्पू दिसत असतील. पण क्रूझवर याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे शक्यतो तुमचं सामान तुमच्यासोबत राहू द्या.
5) क्रूझवर गेल्यावर नेमकी कुठे फॉर्मल ड्रेसची कुठे कॅज्युअल ड्रेसची आवश्यकता आहे याची माहिती घ्या. म्हणजे त्यानुसार तुम्हाला पॅकिंग करता येईल. एखादा बर्मुडाही सोबत ठेवा. कारण क्रूझवर असा लूक खूप ट्रेण्डी वाटतो.6) एवढं सगळं पॅकिंग करताना सुटकेसमध्ये थोडीशी जागाही नक्की ठेवा. कारण क्रूझवर एखादी हटके शॉपिंग झालीच तर परत येताना छान आठवण सोबत राहील.7) अनेक क्रूझच्या रूममध्ये अलार्मची सुविधा नसते. त्यामुळे योग्य वेळी जाग येण्यासाठी अलार्म सोबत ठेवा. यासाठी तुम्ही तुमच्या फोनचा वापर करणार असाल तर तो फ्लाईट मोडमध्ये ठेवा. त्यामुळे रोमिंगचा अतिरिक्त खर्च वाचेल.8)क्रूझवर जाताना तुमची आवश्यक कागदपत्रं तुमच्यासोबत राहू द्या. शिवाय त्यांची योग्य काळजीही घ्या. पासपोर्ट, ओळखपत्र, शिप बोर्डिंग पास, क्रूझवर लागणारी इतर कागदपत्रं व्यवस्थित सांभाळा.तुमच्या नेहमीच्या ट्रीपपेक्षा क्रूझची सफर थोडीशी वेगळी असते. त्यामुळे कपडे, गरजेचं सामान जास्त चोखंदळपणे घेणं गरजेचं आहे. या टीप्स जर लक्षात ठेवल्या तर तुमचा क्रूझ ट्रीपचा आनंद नक्की द्विगणित होईल.