एकट्याने किंवा केवळ ग्रुपने फिरायला जाण्याची क्रेझ आता महिलांमध्येही बघायला मिळत आहे. आधी महिला एकट्याने प्रवास करणे एक मोठं कठीण काम समजत होत्या, पण आता हा एक ट्रेन्ड होतो आहे. एकट्याने फिरणं आता बऱ्यापैकी सोपं आणि सहज झालं आहे. तुम्ही एकट्याने फिरून वेगवेगळी ठिकाणे एक्सप्लोर करू शकता. फक्त तुम्ही जिथे जाताय ते ठिकाण सुरक्षित असावं. तुम्हीही फिरायला जाण्यासाठी अशाच सुरक्षित ठिकाणाच्या शोधात असाल तर भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत. अशाच ५ ठिकाणांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मुन्नार
केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील हे ठिकाण निसर्गाचं वरदान मिळालेलं ठिकाण आहे. इथे आल्यावर एखाद्या सिनेमाच्या सेटवर आल्यासारख अनुभव येतो. १२ हजार हेक्टर परिसरात पसरलेल्या येथील चहाच्या बागा या शहराच्या सौंदर्यात दुपटीने भर घालतात. तसे तर हम्पीमध्ये तुम्हाला हनीमूनसाठी आलेल्या कपल्सची गर्दी दिसेल. पण एकट्याने येण्यासाठी हे ठिकाण फार सुरक्षित मानलं जातं. इथे फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत.
हम्पी
यूनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये असलेल्या हम्पीला बघण्यासाठी देश-विदेशातून पर्यटकांची गर्दी असते. जर तुम्ही एकट्याने फिरण्याचा प्लॅन करत असाल तर हम्पी फार परफेक्ट डेस्टिनेशन आहे. असं म्हटलं जातं की, हम्पी एकेकाळी रोम पेक्षाही समृद्ध होतं. इथे आल्यावर त्याच प्रचिती सुद्धा येते. सुंदर डोंगर आणि ५०० पेक्षा अधिक स्मारक चिन्ह इथे बघायला मिळतात. इथे येण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च महिना परफेक्ट कालावधी मानला जातो.
शिलॉन्ग
'स्कॉटलॅंड ऑफ इस्ट' या नावाने लोकप्रिय शिलॉन्ग फारच सुंदर आणि महिलांसाठी सुरक्षित शहर आहे. इथे तुम्ही बिनधास्त फिरण्याचा आनंद घेऊ शकता. मेघालयाच्या या राजधानी सौंदर्य आणखी खुलतं ते येथी डोंगरांमधून कोसळणारं पाणी, आकाशाला कवेत घेणारे डोंगर आणि दूरदूरपर्यंत पसरलेली गवताची मैदाने. जर तुम्ही एकट्या फिरायला निघाल्या असाल तर हा अनुभव तुमच्यासाठी फारच अनोखा ठरेल. येथील लोकही फार मनमिळावू आणि मदत करणारे आहेत.
उदयपूर
राजस्थानमधील उदयपूर फारच शांत आणि सुंदर आहे. इथे फिरण्यासाठी तुम्हाला खरंतर कुणाच्या कंपनीची गरज पडणार नाही. शहर फिरण्यासाठी तुम्हाला २ ते ३ दिवस पुरेसे झालेत. येथील लोकांचाही तुम्हाला चांगला अनुभव येईल. तसेच तुम्ही जर खाण्याचे शौकीन असाल तर इथे तुम्ही वेगवेगळे पदार्थ चाखू शकता.
गोवा
तुम्हाला जर असं वाटत असेल की, गोव्यात फक्त मित्र-मैत्रिणींसोबतच एन्जॉय केलं जाऊ शकतं, तर तुम्ही चुकताय. गोव्यात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही एकटे फिरू शकता. केवळ समुद्र किनारेच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही फिरून एन्जॉय करू शकता.