शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

फक्त एका तिकिटाने पूर्ण होणार वर्ल्ड टूरचे स्वप्न; जाणून घ्या कसा असेल १४० देशांचा प्रवास...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 6:05 PM

तुम्हालाही या अनोख्या प्रवासाला जायचे असेल, तर जाणून घ्या बुकिंग कसे असेल आणि भाडे काय असेल?

दरवर्षी लाखो लोक भरपूर पैसा खर्च करून विविध देशांना भेट देतात. तुम्हालाही विदेशात फिरण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आली आहे. पण, यासाठी तुम्हाला जास्त पैसा आणि वेळ खर्च करावा लागणार आहे. ही विदेशवारी एका जहाजाद्वारे १००१ दिवसात पूर्ण होईल आणि तुम्ही जगभरतीत जवळपास १४० देशांना भेट देऊ शकता. Life At Sea Cruises ची MV Lara Cruise लोकांना जगभरात एका अनोख्या प्रवासावर घेऊन जाणार आहे. ज्यामध्ये प्रवाशांना अनेक देश पाहण्याची संधी मिळणार आहे. तुम्हालाही या अनोख्या प्रवासाला जायचे असेल, तर जाणून घ्या बुकिंग कसे असेल आणि भाडे काय असेल?

Life At Sea Cruises चे सीईओ सांगतात की, ज्या लोकांना आपल्या कामाचे आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यात संतुलन राखायचे आहे, त्यांना लक्षात घेऊन ही टूर तयार करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जे लोक रिमोट वर्क करत आहेत किंवा वर्क फ्रॉम होम करत आहेत, ते या वर्ल्ड टूरवर जाऊ शकतात. या १३०,००० मैल लांबीच्या टूरची तयारी कामासोबतच प्रवास करणाऱ्या अशा रसिकांसाठी करण्यात आली आहे. MV Lara Cruise ७ खंडातील १४० देश आणि ३८२ बंदरांवर थांबेल. यादरम्यान ते चीन, रोम, भारत, उत्तर अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये जाणार आहेत. या प्रवासात लोकांना जगातील १३ आश्चर्येही पाहायला मिळणार आहेत. प्रवाशांना प्रवासात जास्त वेळ पोर्ट टाइम मिळेल आणि अशा परिस्थितीत ते प्रत्येक देशात पुरेसा वेळ घालवू शकतील.

या संपूर्ण टूरमध्ये प्रवाशांच्या खाण्यापिण्याची आणि क्रूझवर राहण्याची भव्य व्यवस्था करण्यात आली आहे. क्रूझमध्येच जिम, पूल, स्पा, ऑडिटोरियम आणि रेस्टॉरंटची सुविधा असणार आहे. www.lifeatseacruises.com वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार,  या क्रूझवर 3 वर्षांच्या प्रवासासाठी डबल ऑक्युपेंसी म्हणजेच दोन लोकांसाठी तुम्हाला प्रति वर्ष ७७,०२६ डॉलर भरावे लागतील. तिकीट बुक करण्यासाठी https://www.lifeatseacruises.com ला भेट द्यावी लागेल. भारतीय रुपयानुसार ही रक्कम ६३,७८,५२३ रुपये होते. आता या अनोख्या प्रवासाला ८५ दिवस उरले आहेत. ही क्रूझ १ नोव्हेंबर २०२३ रोजी इस्तंबूल येथून प्रवास सुरू करेल. ५ नोव्हेंबर रोजी बार्सिलोना येथून पकडले जाऊ शकते.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सInternationalआंतरराष्ट्रीय