शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

तुम्ही 'इथे' बघू शकता भगवान विष्णूचं जगातलं सर्वात मोठं मंदिर!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 12:53 PM

कंबोडिया येथील आंग्कोर वाट हिंदू मंदिराचं नाव तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. भगवान विष्णू यांना समर्पित हे जगातलं सर्वात मोठं मंदिर मानलं जातं.

कंबोडिया येथील आंग्कोर वाट हिंदू मंदिराचं नाव तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. भगवान विष्णू यांना समर्पित हे जगातलं सर्वात मोठं मंदिर मानलं जातं. या मंदिराचं निर्माण १२व्या शतकात करण्यात आलं होतं. तशी तर परदेशात फिरण्यासाठी वेगवेगळी ठिकाणे आहेत, पण जेव्हा विषय एखाद्या धार्मिक स्थळाचा येतो तेव्हा आंग्कोर वाटचं नाव सर्वात वरच्या क्रमावर यायला हवं. जर तुम्हीही परदेशात कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही कंबोडियाकडेही पर्याय म्हणून बघू शकता. 

आंग्कोर वाट किंवा आंगकोर वट हे आंग्कोर, कंबोडिया येथील राजा सूर्यवर्मन दुसरा याच्या कारकिर्दीत बांधले गेलेले बाराव्या शतकातील हिंदू मंदिर आहे. अप्रतिम स्थापत्यशास्त्र आणि भव्य शिल्पकलांचा नमुना म्हणून ओळखले जाणारे आंग्कोर वाट हे मध्ययुगात 'व्रह विष्णुलोक' (गृह विष्णुलोक?) म्हणून ओळखले जाई.

हिंदू व बौद्ध स्थापत्यशास्त्रांचा उपयोग करून बांधलेले आंग्कोर वाट हे भगवान विष्णूंचे जगातील सर्वांत मोठे मंदिर समजले जाते. या मंदिराची निर्मिती भारतीय खगोलशास्त्राचे नियम वापरून करण्यात आली आहे असेही सांगितले जाते.

(Image Credit : Wilderness Travel)

मीकांग नदीच्या किनाऱ्यावरील सिमरीप शहरात असलेलं हे मंदिर शेकडो मैल पसरलेलं आहे. दरवर्षी लाखो पर्यटक हे मंदिर बघण्यासाठी इथे भेट देतात. महत्त्वाची बाब म्हणजे कंबोडियाच्या राष्ट्रीय ध्वजातही या मंदिराचा फोटा बघायला मिळतो. हे मंदिर बुद्धांच्या मूर्तींसाठीही प्रसिद्ध आहे. 

बघण्यासारखं काय काय?

एलिफंट टेरेस

(Image Credit : Lifeswanderlust)

इथे १ हजार फुटाचा एलिफंट टेरेस आहे. ज्याचा वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी वापर केला जात होता. इथे फारच गर्दी असते आणि फोटो काढणाऱ्यांची गर्दी असते. त्यामुळे बरं होईल की, हे ठिकाण पाहण्यासाठी सकाळीच जावं किंवा दुपारी जावं. 

Preach Khan 

हे अंगकोर वाटमधील सर्वात मोठ्या साइट्सपैकी एक आहे. इतिहासकार मानतात की, इथे एक मोठं युद्ध लढलं गेलं होतं. त्यासोबतच इथे आणखीही काही ऐतिहासिक ठिकाणे आहेत, ज्यात प्री रप (Pre Rup), प्री को (Preah Ko) आणि रा रॅंग (Srah Srang) या ठिकाणांचा समावेश आहे. 

या गोष्टींची घ्या काळजी

१) इथे जाण्याआधी या ठिकाणाबाबत चांगली माहिती मिळवा. जेणेकरून इथे आल्यावर तुम्ही प्रत्येक गोष्ट चांगल्याप्रकारे समजून बघू शकाल. 

(Image Credit : Peregrine Adventures)

२) हे मंदिर फार मोठ्या परीसरात पसरलेलं असल्याने तुम्हाला फार जास्त चालण्याचीही गरज पडेल. त्यामुळे तशी तयारी करणेही गरजेचे आहे. 

३) तसे तर तुम्ही आंग्कोर वाट इथे दिवसातील कोणत्याही वेळेत जाऊ शकता. पण अनेकजण सांगतात की, इथे सूर्य उगवण्यापूर्वी गेलात तर तुम्हाला उगवत्या सूर्याचा सुंदर नजारा बघायला मिळू शकतो. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन