- जयदीप मिरचंदानी, अध्यक्ष, स्कायवनलीकडच्या काही वर्षांत विमान प्रवासादरम्यान वैयक्तिक सेवासुविधा मिळविण्याबाबत प्रवासी भर देत आहेत. प्रवासादरम्यान त्यांना काय हवे, काय नको याकडे विमान कंपन्याही लक्ष देत आहेत. त्यानुसार अधिकाधिक प्रवासीकेंद्रित सुविधा देण्यासाठी आवडीप्रमाणे सीट क्रमांक, जेवणामध्ये प्रवाशांना आवडणारे आणि मागणीप्रमाणे पर्याय उपलब्ध करण्यासह वैयक्तिक सुविधांवर कंपन्या भर देत आहेत. अन्य क्षेत्राप्रमाणे विमान वाहतूक क्षेत्रातही कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग (एमएल), ऑगमेंटेड रिॲलिटी (एआर) तसेच ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.
एअर इंडियाने नुकताच ‘महाराजा’हा बहुभाषिक व्हर्च्युअल एजंट लॉन्च केला. विमान वाहतूक सुकर होण्यासह विमानांची देखभाल-दुरुस्ती, तसेच दोष व त्रुटी दूर करण्यासाठी एआयच्या वापरावर भर दिला जाईल. सायबर हल्ले रोखत प्रवाशांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल. विमानांच्या उड्डाणाद्वारे कमीतकमी कार्बन उत्सर्जन होईल आणि पर्यावरणाचे संवर्धन कसे करता येईल, याकडे लक्ष दिले जात आहे. त्यासाठी शाश्वत विमान इंधन व ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन दिले जाईल. २०५० पर्यंत विमान वाहतूक क्षेत्राने शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य ठेवले आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही विमान कंपन्यांनी जैव इंधनाचा थोड्या प्रमाणात वापर सुरू केला आहे.
आशियाई बाजारपेठेवर जगाचे लक्षnकोरोनानंतरच्या काळात विमान वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०२४ मध्ये जगातील एकूण विमान प्रवाशांची संख्या ९.४ अब्जांपर्यंत वाढण्याचा अंदाज एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलने (एसीआय) वर्तवला आहे. त्यातही आशियाई देशांमध्ये विमान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता अनेक कंपन्या आशियाई बाजारपेठेत गुंतवणूक करण्यास उत्सुक असतील. nभविष्याचा वेध घेत आणि नवे ट्रेंड्स आत्मसात करत जागतिक विमान वाहतूक क्षेत्र ग्राहककेंद्रित व्यवसायाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार, शाश्वत हवाई इंधनाचा वापर, सुपरसॉनिक जेट विमानांसाठी प्रयत्न करत नववर्षात विमान कंपन्यांच्या प्रगतीचे पंख विकासाकडे झेपावतील, हे मात्र निश्चित.