ठळक मुद्देघराला बनवा तुमची प्रयोगशाळा
साहित्य कागद, पेन किंवा पेन्सिल.कृती 1. एक तीन अंकी संख्या घ्या. अट एकच तीनही अंक एक सारखे नकोत. शून्य असले तरी चालेल. एक अंक दोनदा असला तरी चालेल.2. या तीन अंकी संख्येतले अंक उतरत्या क्रमाने लावा ती संख्या कागदावर लिहा.3. हेच तीन अंक चढत्या क्रमाने लावा आणि ही संख्या आधीच्या संख्येतून वजा करा. 4. वजाबाकी तीन अंकी येईल. ही तीन अंकी संख्या घेऊन त्यातले तीन अंक उतरत्या क्रमाने लावा ती संख्या कागदावर लिहा. 5. हेच तीन अंक चढत्या क्रमाने लावा आणि ही संख्या आधीच्या संख्येतून वजा करा. 6. असे करत करत एक वेळ अशी येईल की तुम्हाला 495 हेच उत्तर मिळेल.- 495 या क्रमांकाला कापरेकर स्थिरांक म्हणतात.