नुकताच मदर्स डे झाला. तुम्ही पण तुमच्या आईला मस्त एखादं ग्रीटिंग करून दिलं असेल ना? जसं आपलं आपल्या आईवर खूप खूप प्रेम असतं तसंच प्राण्यांच्या पिल्लांचंही त्यांच्या आईवर खूप प्रेम असतं आणि आईचंही तिच्या पिल्लांवर. आई आणि पिल्लं एकमेकांशी खूप खेळतात. धमाल करतात. तुम्हाला आई आणि मुलांचे असे व्हिडीओज बघायचे आहेत? ह्यूस्टन झू म्हणून एक युट्युब चॅनल आहे. या चॅनलवर ह्यूस्टन मधल्या झूमध्ये असलेल्या प्राण्यांचे खूप मस्त व्हिडीओज आहेत. हे प्राणी एकमेकांशी खेळतात. धमाल करतात. यात आई आणि पिल्लांचेही व्हिडीओज आहेत. शिवाय नेल्सन नावाच्या हत्तीच्या पिल्लाचाही क्युट व्हिडीओ आहे.
असाच अजून एक चॅनल आहे द डोडो. यात बेस्ट ऐनिमल मॉम एव्हर असा एक व्हिडीओ आहे. ज्यात जिराफ, हत्ती, गाईपासून अनेक जंगली प्राण्यांचे त्यांच्या पिल्लांबरोबरचे व्हिडीओज आहेत. त्यातही आई पिल्लाचं संरक्षण कसं करतेय किंवा त्याला स्वत:च्या पायावर उभं राहायला कसं शिकवतेय हे दाखवणारे क्युट व्हिडीओज आहेत. एक हंसिणी आपल्या आठ पिल्लाना पाठीवर घेऊन पंखात कशी लपवते याचाही एक सिन यात आहे. अगदी व्हेल आई बरोबर तिचं पिल्लू सात आठ महिन्यांचं होई पयर्ंत असतं आणि आई त्याला काय काय शिकवते याची झलक या व्हिडिओत बघायला मिळेल. असे खूप सुंदर सुंदर क्लिप्स असलेले व्हिडीओज तुम्हाला युट्युबवर बघायला मिळतील. सर्च करा: Huston Zoo आणि Animal moms with cute babies