ठळक मुद्दे बाटलीतली हवा गार होत जाईल तसतसा फुगा आपोआप फुगत जाईल.
साहित्यप्लॅस्टिकची बाटली, गरम पाणी, वाडगा, गार पाणी. फुगा.कृती1. एका प्लॅस्टिकच्या बाटलीत गरम पाणी भरा. 2. एका वाडग्यात बर्फासारखे गार पाणी भरा. 3. बाटलीतले गरम पाणी ओतून टाका आणि पटकन बाटलीच्या तोंडावर एक रबरी फुगा बसवा.4. फुग्याचा न फुगलेला भाग बोटाने बाटलीत ढकला. ही बाटली वाडग्यातल्या गार पाण्यात ठेवा.5. बाटलीतली हवा गार होत जाईल तसतसा फुगा आपोआप फुगत जाईल.
असं का होतं?बाटलीतील हवा गार झाली की तिचा दाब कमी होतो. बाहेरील हवेचा दाब जास्त असल्याने ती फुग्यात शिरते आणि त्याला फुगवते.