शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबादास दानवेंचे विरोधीपक्षनेते पद धोक्यात; संख्याबळ समान झाल्याने काँग्रेसला हवे झाले...
2
महायुतीचा फॉर्म्युला; सहा आमदारांमागे एक मंत्रिपद; विस्तारासाठी फडणवीस, अजित पवार दिल्लीत
3
आजचे राशीभविष्य - १२ डिसेंबर २०२४: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
4
परभणी बंदला हिंसक वळण; जमावबंदी लागू; तणाव कायम
5
सातपुड्यात दवांचा बर्फ; तापमान आले ६ अंशांवर; काश्मीरसारख्या थंडीचा अनुभव
6
जामिनासाठी न्यायाधीशाने मागितले पाच लाख; चौघांवर गुन्हा दाखल
7
गुलाब घेऊन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचे स्वागत; राहुल गांधींनी राजनाथ सिंह यांना दिला तिरंगा
8
‘इंडिया’चा हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात महाभियोग
9
तलाठी बनविताे : क्लास वन अधिकाऱ्याने 16 जणांना गंडविले
10
भारताने माघार घेतल्यास ५,७२० कोटी रुपयांचे नुकसान; पाकने घेतल्यास केवळ ६३५ कोटींचा फटका
11
शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार, ‘नाबार्ड’चे कडक निकष :  जेवढा हिस्सा तेवढाच लाभ 
12
परभणीतील घटनेच्या मागे कोण? सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचा सवाल; शांततेचे आवाहन
13
बुमराह अव्वल स्थानी कायम, कसोटी क्रमवारी; फलंदाजांमध्ये ब्रूकचा दबदबा
14
एबडेनला नवा साथीदार हवा होता : रोहन बोपन्ना
15
गुगलवरून शोधले विदेशी फळ; उत्पन्न एकरी 10 लाख; मुरमाड जमिनीत फुलली शेतकऱ्याची यशोगाथा
16
संपादकीय: धनखड यांच्यावरील विरोधकांचा अविश्वास की इष्टापत्ती?
17
केजरीवाल धास्तावले?- छावणीत चिंतेचे सावट!
18
शास्त्रशुद्ध, तर्कशुद्ध आणि ताठ कण्याचा व्रतस्थ अभ्यासक
19
Video: रिल बनवण्याचा नाद भोवला! चालत्या ट्रेनमधून बाहेर लटकलेली तरूणी खाली पडली अन्...
20
'चेस मास्टर' रहाणे! मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी भाऊच्या भात्यातून आला 'फिफ्टी प्लस'चा 'चौकार'

व्यायाम  करताय ? चाला, अस्वलाची चाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 5:57 PM

बेअर क्रॉल

ठळक मुद्देआज अस्वलाचा, ‘बेअर क्रॉल’ हा व्यायाम आपल्याला करायचा आहे.

काय मग? जंगली आणि पाळीव प्राण्यांशी तुमची दोस्ती झाली की नाही?कोणते प्राणी आणि कोणत्या प्राण्याचा व्यायाम तुम्हाला जास्त आवडला?आज मी तुम्हाला जंगलातल्या सर्वात डेंजर प्राण्याची माहिती आणि त्याच्या व्यायामाविषयी सांगणार आहे. जंगलातला सर्वात डेंजर प्राणी (अर्थात माणसासाठी) म्हणजे अस्वल. जंगल अभ्यासकही नेहमी या प्राण्यापासूनच सांभाळून राहायला सांगतात.या प्राण्यात एकतर ‘येडी’ ताकद असते आणि डोकं थोडंसं कमी. म्हणजे सणकी. जंगली अस्वलाच्या कचाटय़ात सापडलं, तर आपल्या केसाळ पंज्यात लपलेल्या धारदार नख्यांनी तो माणसाचं मांस थेट हाडांर्पयत; अगदी कवटीही सोलून काढू शकतो. अस्वलं तशी  बोजड असतात. पाय छोटे असतात. त्याला दिसतं कमी, पण तब्बल दीड किलोमीटरवरचा वास त्याला कळू शकतो.आज अस्वलाचा, ‘बेअर क्रॉल’ हा व्यायाम आपल्याला करायचा आहे.

कसा कराल हा व्यायाम?1- अस्वल जसं आपल्या चारही पायांवर उभं राहतं, तसं आपले दोन्ही पाय आणि दोन्ही हात जमिनीवर टेकवा.2- ढुंगणं थोडं उंच करा. ढुंगण पाठीच्या वर असलं पाहिजे. पोट थोडं आत घ्या.3- दोन्ही हातांत खांद्याइतकं अंतर घ्या.4- नजर समोर.5- आधी उजवा हात आणि डावा पाय पुढे घेत एक पाऊल टाका.6- आता डावा हात आणि उजवा पाय.7- चाला अशा पद्धतीनं.यामुळे काय होईल?1- तुमच्या शोल्डरमधली ताकद वाढेल.2- पाठ मजबूत होईल.3-  पोटाचे मसल्स तयार होतील.4- मांडय़ांचे स्नायू बळकट होतील.5- हात दणकट होतील.अस्वलाची ही चाल सुरुवातीला जमणार नाही, अवघड वाटेल, पण एकदा का ही चाल तुम्हाला जमायला लागली, की मग बघा, तुमची ‘नखं’ कशी बाहेर येतील ते!.- तुमचीच जंगली ‘सोलकढी’, ऊर्जा