अँण्ड्र टय़ूटो बेने . नाही कळला ना अर्थ. कारण हे वाक्य आहे इटालियन भाषेतलं. याचा अर्थ ‘सगळं चांगलं होईल’ हा आहे.कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे इतर सर्व उपक्रम बंद झाले आहेत. सगळ्यांना जबरदस्तीनं घरात बसावं लागतंय. इटलीतील मुलांना बाहेर येऊन खेळावंसं वाटतं; पण खेळता येत नाही. बाहेर पडून लोकांशी बोलावंसं वाटतं; पण बोलता येत नाही. पण त्यावर त्यांनी एक युक्ती शोधून काढली आहे. ती म्हणजे चित्राची. या चि त्रातून सर्व मुलांना एकच संदेश द्यायचा आहे तो म्हणजे ‘सगळं काही चांगलं होईल!’
त्यासाठी या मुलांनी इंद्रधनुष्याचं चित्र निवडलं आहे. प्रत्येकजण कागदावर इंद्रधनुष्याचं चित्रं काढतात. तेरंगवतात. त्याखाली ते ‘अॅण्ड्र टय़ूटो बेने’ असा संदेश लिहितात. हे चित्र ते घरात ठेवत नाही तर ते बॅनर किंवा पोस्टरसारखं घराबाहेर टांगतात.
रस्त्यावर जाणा-या येणा-यांचं लक्ष या चित्राकडे, चित्रातल्या रंगीबेरंगी इंद्रधनुष्याकडे आणि त्याखालच्या संदेशाकडे जातं. कोरोनाच्या दहशतीने चिंताग्रस्त झालेल्या चेहे-यांवर मग हसू उमटतं. लोकांनी हसावं, चांगला विचार करावा म्हणून तर मुलं हे इंद्रधनुष्याचं चित्र काढत आहेत.