मला आता सगळं करून खरंच खूप कंटाळा आलाय. मी माझा वेळ कसा घालवू?- वैष्णवी नलावडे
वैष्णवी हा प्रश्न फक्त तुला नाही सगळ्यांनाच पडला आहे. ंआता हळूहळू लॉक डाउन संपून आपण अनलॉकिंगला सुरुवात केलेली आहे. आयुष्य पूर्वपदावर यायला अजून वेळ लागणार हे नक्की. घरात बसून बसून कंटाळा येतोच. तुम्हा मुलांना येतो आणि मोठ्यांनाही येतो. अशावेळी वेळ कसा घालवावा हा खूपच मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. वेळ घालवण्यासाठी मग आपल्यापैकी अनेक जण मोबाईलचा आसरा घेताना दिसत आहेत, पण तू प्लिज तसं करू नकोस. म्हणजे मोबाईल आणि टीव्ही बघू नकोस असं नाही पण किती वेळ बघायचं याच स्वत:च एक वेळापत्रक तयार कर आणि त्याला चिकटून राहण्याचा प्रय} कर. सध्या आपलं रुटीन खूपच विस्कळीत झालंय. आपण कधीही उठतो, कधीही झोपतो. वेळ कसा घालवू या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात पहिल्यांदा रुटीन सेट करण्यात आहे. सकाळी उठण्याची, रात्री झोपण्याची वेळ निश्चित कर. ती पाळ. मग उरलेल्या वेळात काय काय करता येईल याचा विचार कर. तू ऊर्जा नियमित वाचत असशील तर वेळ घालवण्यासाठीचे मस्त मार्ग ऊर्जा नेहमीच सांगते. त्यातल्या काही गोष्टी कर.
घरात मदत कर. एखादी भाषा शिक. नवं काहीही शिकायचं कंटाळा आला असेल तर लोळत पड. पुस्तक वाच. घरात शोधली तर शंभर कामं निघतात आणि ती करता करता दिवस कसे संपून जातात समजत नाही. बघ प्रय} करून. कपड्यांचं कपाट, डेस्क आवर, घराची जाळीजळमटं काढ. करण्यासारखा खूप गोष्टी आहेत. शोध म्हणजे सापडतील.