सध्या शाळा तर बंद आहेच पण वाचनालयेही बंद आहेत. नवीन पुस्तकं आपण घेऊ शकत नाही. पण मुलांसाठी भरपूर वाचायला ऑनलाईनही उपलब्ध असतं. त्यात कितीतरी वेबसाईट्स आहेत ज्या मोफत पुस्तकं वाचायला देतात. यात फ्री चिल्ड्रन स्टोरीज नावाची एक वेबसाईट आहे. ज्यावर अगणित पुस्तकं उपलब्ध आहेत. वय वर्ष तीन ते टिनेजर्स साठीच्या कादंब?्यांपयर्ंत अनेक पुस्तकं या साईटवर उपलब्ध आहेत.मग घरात कंटाळा आला तरी आईच्या डोक्याशी भुणभुण करू नका.
गुगल वर जा, आणि फ्री चिल्ड्रन स्टोरीज free children stories असं टाईप करा.
शिवाय गुगलवरच free books for kids असं सर्च केलंत की तुम्हाला अजूनही वेबसाईट्स बघायला मिळतील.
जगभरातल्या लेखकांची ही पुस्तकं तुम्ही तर वाचाच पण त्यातलं तुम्हाला जे आवडेल त्याची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीनाही पाठवा.
सध्या तुम्हाला एकमेकांना भेटता येत नाहीये ना, पण अशा लिंक्सची देवाण घेवाण करून तुम्ही एकमेकांशी कनेक्टेड राहू शकता.