कोरोना कधीच जाणार नाहीये म्हणतात मग आपण कायम असंच घरात बसून राहायचं का? हे कसं शक्य आहे? - आर्या नवले, वर्धा
कोरोना विषाणू कधीच जाणार नाही हे अगदी खरं आहे. कोरोना विषाणूचे आजवर 1क्क् प्रकार माणसाला माहित झालेले आहेत. त्यातल्या आठएक प्रकारांचा संसर्ग माणसाला होतो. पण कोविड 19 हा त्यातला सगळ्यात जास्त बाधा करणारा विषाणू आहे. यावर औषध नाही की लस नाही. लस शोधण्याचे प्रयन्त सुरु आहेत पण ती केव्हा मिळेल , हे आजतरी आपल्याला सांगता येत नाही त्यामुळे कोरोना कधीच जाणार नाही हे एकाअर्थी बरोबर आहे. पण याचा अर्थ आपण कधीच घराबाहेर पडायचं नाही असा मुळीच नाही. आताची परिस्थिती बिकट आहे म्हणून आपला लॉक डाऊन सतत वाढवला जातोय. पण या विषाणूचा संसर्ग जरा आटोक्यात आला की आपल्याला बाहेर जायला आणि नियमित आपापलं काम करायला नक्की परवानगी मिळेल. तशी महाराष्ट्रात जे जे भाग ग्रीन झोन म्हणून घोषित झाले आहेत तिथे बंदी शिथिलही केलेली आहे. मुळात आर्या, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे कालपयर्ंत आपण जसं जगत होतो तसं यापुढे आपल्याला जगता येणार नाही. आपल्याला आपल्या सवयी आता बदलाव्या लागतील. आता लॉक डाउनच्या काळात आपण जे सोशल डिस्टंसिंग पळतोय ते आपल्याला कदाचित पुढे अजून काही महिने पाळावं लागेल. तोंडाला मास्क बांधूनच घराबाहेर पडण्याची सवय बदलून चालणार नाही. निदान पुढची एक दोन वर्ष तरी. आपण बाहेरून आणलेला भाजीपाला, बंद पाकिटातल्या वस्तू ज्याप्रमाणो घरात ठेवण्याआधी आता धुवून घेतोय तसंच आपल्याला कायम करावं लागेल. कचरा न करणं, रस्त्यात कुठेही न थुंकणं, शौचाला उघड्यावर न जाणं, सार्वजनिक स्वच्छता गृह वापरल्यावर भरपूर पाणी टाकून स्वच्छ ठेवणं या गोष्टींकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी सवयीचा भाग व्हायला हव्यात. बाहेर जाताना, बाहेरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुणं हे कायमचं लक्षात ठेवावं लागेल.
आणि सगळ्यात महत्वाचं आता आपल्याला सगळ्या सरकारी यंत्रणांनाही त्यांची कामे चोखच करावी लागतील, आणि आपल्याला सगळ्यांना त्यांना मदतही करावी लागेल. म्हणजे मग आपण बाहेरही पडू शकू आणि आपलं आयुष्य पुन्हा जगायला सुरुवातही करु शकू.