12 वर्षा़चा क्वाईन कॉलेण्डर कॅनडा मध्ये व्हॅनकोव्हर येथे राहातो. तो बॉइज स्काऊटमधला एक सदस्य आहे. कोरोनाच्या काळात त्याच्या कानावर सतत एक गोष्ट पडत होती. ती म्हणजे मास्कच्या त्रास ची. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मास्क. तासनतास असा मास्क वापरल्यानं डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा देणा:यांना प्रचंड त्रस होत असल्याच्या बातम्या क्वाईन रोज आजूबाजूला ऐकत होता, टीव्हीवर पाहात होता. या मास्कचं इलॅस्टिक कानाच्या मागे घट्ट बसत असल्यानं कानावर, डोक्यावर प्रचंड ताण येतो . कानाच्या मागे, चेहे:यावर वळ उमटतात. तिथे खूप दुखतं. डॉक्टरांना, पोलीसांना - ज्यांना ज्यांना सतत मास्क वापरावा लागतो, त्या सगळ्यांना हा त्रास फार होतो.- हा त्रास कमी कसा करता ये ईल, असा विचार करताना क्वाईनला ‘इअर गार्ड’ची कल्पना सूचली. प्लास्टिकचा इअर गार्डनं मास्क वापरणं सोप होऊ शकतं हे त्यानं जाणलं. मग त्यानं या इअर गार्डची डिझाइन बनवायला सुरूवात केली. सुरूवातीला हे इअर गार्ड त्यानं आपल्या घरातल्या 3डी प्रिंण्टरवरच तयार केलं. हा इअर गार्ड बनवण्यासाठी त्यानं 3 डी प्रिण्टरसाठी वापरण्यात येणा:या पॉली लॅक्टिक अॅसिडचा वापर केला. प्लॅस्टिक स्ट्रीप असलेला हा इअर गार्ड डोक्याच्या मागे मास्कच्या दोन्ही बाजूच्या इलास्टिकच्या मधोमध अडकवून तो कस्टम फिटींगच्या सहाय्यानं कमी जास्त करता येतो. या इअर गार्डच्या लूपमध्ये अडकवून मास्क कमी जास्त करता येतं. त्याचा फायदा म्हणजे एरवीच्या मास्कनं कानामागे वळ उमटतात, तसे उमटत नाहीत.
क्वाईनचा हा इअर गार्ड डॉक्टरांना फार उपयोगी पडला. मग क्वीनकडे आजूबाजूच्या दवाखान्यातून या इअर गार्डची मागणी यायला लागली. क्वीननं स्वत: 1700 इअर गार्ड बनवले आणि ते आजूबाजूच्या दवाखान्यात वाटले. पण या इअर गार्डची वाढती मागणी एकटा क्वाईन पूर्ण कशी करणार मग त्याच्या बॉइज स्काऊटनं त्याला या कामी मदत केली. त्या सर्वानी मिळून 5000 इअर गार्ड तयार केले तरीही इअर गार्डची मागणी वाढायलाच लागली. मग क्वाईननं इअर गार्ड स्ट्रीपचं डिझाईन फेसबुकवर टाकलं. आणि तिथून ज्यांना हवं त्यांना ते डाऊनलोड करता येईल याची सोय केली. क्वाईननं मार्चच्या शेवटी हा इअर गार्ड तयार केला. आणि ऑनलाइन डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून दिली. तेव्हापासून आतार्पयत हजारो ऑनलाइन युजर्सनं क्वाईनचं हे डिझाईन डाऊनलोड केलं आहे.