आपण सर्वांनी सॅनिटायजरने हात धुवायला हवेत असं हल्ली सारखं सांगत असतात पण मला कळतच नाही की या परिस्थितीमधे कोणतं हॅण्ड वॉश आणि सॅनिटायझर चांगलं आहे? सॅनिटायझरने हात स्वच्छ करायला सांगितलं जातंय हे खरं आहे पण ते घराबाहेर आणि जिथे पाणी/साबण उपलब्ध नाही तिथे. घरात किंवा जिथे पाणी आणि साबण उपलब्ध आहे अशा ठिकाणी साबणाने 20 सेकंद हात धुतले तरी पुरेसं आहे. मुळात हात स्वच्छ धुतले गेले पाहिजेत हे महत्वाचं आहे. आता कुठलं सॅनिटायझर घ्यावं हा अतिशय अवघड मुद्दा आहे. कारण बाजारात फेक सॅनिटायझर्स पण विकली जात आहेत. बाजारात बनावट किंवा अनोळखी कंपन्यांचे सॅनिटायझर्स विकले जात आहेत, कुठली अनोळखी कंपनी चांगली आणि कुठली बनावट हे सांगता येणं अवघड आहे त्यामुळे सॅनिटायझरपेक्षा साबणाने आणि वाहत्या पाण्यात हात स्वच्छ धुणं हा उत्तम पर्याय मानला जातो.
शिवाय सतत सॅनिटायझर्स वापरण्याचे दुष्परिणामही होतात. त्यामुळे सतत सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्याची गरज नाही प्रवासात किंवा साबणाची आणि पाण्याची सोय नसेल अशा ठिकाणी फक्त सॅनिटायझर वापरलं पाहिजे.