घरातल्या घरात मास्क कसा बनवायचा हे तर आपण काल बघितलं. पण असे किती मास्क्स बनवायचे? तर घरातल्या प्रत्येक माणसासाठी किमान दोन मास्क तरी बनवले पाहिजेत. कारण डॉक्टर्स असं सांगतात की एकदा वापरलेला मास्क धुतल्याशिवाय पुन्हा वापरू नये. आणि त्यामागचं कारण अगदी सोपं आहे. आपण मास्क कशासाठी वापरणार? तर आपल्याला भेटलेल्या माणसाला जर कोरोनाचं इन्फेक्शन झालेलं असेल, आणि ते इन्फेक्शन असलेले काही तुषार किंवा थेंब जर का आपल्या चेहे?्यावर उडाले तर ते आपल्या नाकातोंडात जाऊ नयेत म्हणून. याचाच अर्थ असा की आपण घातलेल्या मास्कचा बाहेरच्या बाजूवर इन्फेक्शन असलेले तुषार किंवा कोरोनाचे विषाणू असू शकतात. त्यामुळे मास्कच्या समोरच्या बाजूला आपण हात लावायचा नाही. आणि लावलाच तर तो साबणाने स्वच्छ धुवून टाकायचा. पण मग वापरलेल्या मास्कच काय करायचं?
तर तो प्रत्येक वापरानंतर संपूर्णपणो निजंर्तुक करायचा. कसा?1. वापरलेला मास्क गरम साबणाच्या पाण्यात धुवा आणि नंतर कडक उन्हात पाच तास वाळवा.2. वापरलेला मास्क साबणाच्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि नंतर चक्क पाण्यात दहा मिनिटं उकळवा.3. उकळून झाल्याच्या नंतर तो पूर्ण वाळवा.कोरोनाच्या काळात दोन गोष्टी लक्षात ठेवा.1. एकदा वापरलेला मास्क निजंर्तुक केल्याशिवाय पुन्हा वापरू नका.2. एकमेकांचे मास्क वापरू नका. प्रत्येकाचा मास्क वेगळा ओळखू येईल असाच ठेवा.