शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
"सरकारच्या भरवशावर राहू नका, लाडकी बहीणमुळे..."; नितीन गडकरींचा उद्योजकांना सल्ला
3
Nepal Flood : पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
4
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
5
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
6
ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
7
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
8
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
9
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
10
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
11
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
12
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
13
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
14
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
15
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
16
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
17
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
18
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
20
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...

कोरोना कोरोना खेळताय का तुम्ही? विषय कट म्हणजे कट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 8:34 AM

छान काहीतरी कुकिंग, स्कुल स्कुल, झालं तर गाण्याचे रिअॅलिटी शो, ऑफिस ऑफिस खेळा. पण डॉक्टर डॉक्टर खेळायचं नाही.

ठळक मुद्देबाकी टेन्शन नहीं लेने का बॉस. रिलॅक्स रहने का

.आज थोडं जरा बोलायचं होतं तुमच्याशी!म्हणजे आपण सगळी मुलं शहाणीच आहोत, पण कधीकधी खेळताना आपण गडबड करतो, हे आपल्या लक्षातच येत नाही. आपल्या आईबाबांच्या पण लक्षात येत नाही.तर त्याचं असं झालं, अमेरिकेत एका डॉक्टरकाकांनी एक पेपरमध्ये अलिकडेच एक लेख लिहिला. एवढे मोठे ते डॉक्टरकाका, पण घाबरले होते.म्हणाले, मी घाबरलो आहे तर हेल्प मी!सगळ्यांना बरं करणारे डॉक्टरकाकाच का, हेल्प मी म्हणायला लागले?

तर त्यांच्या असं लक्षात आलं की, एक मुलगी सकाळी उठली की, डॉक्टर डॉक्टर खेळतेय. म्हणजे आपण सगळे खेळतोच ते! जोरात टुचूक करतो आईला-आजीला. एवढा आपला बाबा, पण आपण टुचूक केलं खोटं खोटं की कसा ओरडतो.मजा येते.ैआजोबांचं बीपी बघतो, कधी गोळ्या देतो, आणि सांगतो, कडू असल्या तरी घ्यायच्या. घेताना रडायचं नाही.तर तशीच ही मुलगी पण घरात डॉक्टर डॉक्टर खेळायची. पण ती तिच्या लहानशा जिराफ टेडीला खोटं खोटं थर्मामिटर पाहून, त्याला ताप आलाय का हे पहायची.सतत त्याला काहीतरी औषध द्यायची. तिला तोच खेळ आवडला.तिला वाटत होतं की, आपल्या खेळण्यांना पण कोरोना झालाय.मग डॉक्टर काकांनी अजून छोटय़ा छोटय़ा मुलांना फोन केले, तर त्यापैकी बरेच जण असं खेळत होते.-म्हणून डॉक्टर काका घाबरले आणि म्हणाले, हेल्प मी, हे असं खेळू नका.एकदम विषय कट म्हणजे कट, फायनल कट.छान काहीतरी कुकिंग, स्कुल स्कुल, झालं तर गाण्याचे रिअॅलिटी शो, ऑफिस ऑफिस खेळा. पण डॉक्टर डॉक्टर खेळायचं नाही.

बाकी टेन्शन नहीं लेने का बॉस.रिलॅक्स रहने का..

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या