आम्ही हे लेख पेपरमध्ये का लिहितोय? आणि तुम्ही गावभर हुंदडायचं सोडून गपचूप शहाण्या मुलांसारखे घरात बसून ते लेख का वाचताय? मित्र मैत्रिणी गोळा करून दंगा करायचा, वेळीअवेळी क्रिकेट खेळून लोकांच्या घराच्या काचा फोडायच्या, त्यावरून बोलणी खायची, संध्याकाळभर हुंदडून हट्ट करून कुठेतरी बर्फ गोळा नाहीतर मटका कुल्फी खायचं सोडून तुम्ही घरात बसून कागदाचे कावळे चिमण्या का बनवताय? तर जगभर तो करोना नावाचा विषाणू हैदोस घालतोय म्हणून. तो पसरू नये म्हणून सरकारने लॉकडाऊन जाहीर केलाय. अगदी गरजेच्या वस्तू सोडून इतर काही आणायला जायला सुद्धा परवानगी नाहीये. जगभरातले लोक त्यांच्या त्यांच्या परीने करोनाबद्दल, लॉकडाऊन बद्दल त्यांचं मत नोंदवतायत. डॉक्टर्सचे आभार मानतायत.- पण या सगळ्यात तुमचं मत कुठे आहे? तुमच्या पण आयुष्यावर करोनामुळे इतका परिणाम झालाय. पण तुम्ही तर त्यावर काही बोलतच नाही आहात. परत जेव्हा शाळा सुरु होईल तेव्हा तुमचे भाषेचे शिक्षक तुम्हाला करोना या विषयावर निबंध लिहायला सांगतीलच. पण एकतर त्याला फार वेळ आहे आणि दुसरं म्हणजे निबंध हा तसा अभ्यासातला एक भाग आहे. त्यापेक्षा तुम्ही करोनाबद्दल एखादं रॅप सॉंग का लिहीत नाही? एक नमुन्याचं आम्ही लिहिलंय. पण ते काही फार भारी झालं नाहीये. तुम्हाला जमतंय का बघा बरं.. करोनाबद्दल, पोलिसांबद्दल, डॉक्टर्सबद्दल किंवा करोनासंबंधी इतर कशाहीबद्दलङ्घ लिहून तर बघा!
हा करोना का आलात्याने केलाय राडात्याने केली गोचीघरामध्ये झोपडीमध्येरस्त्यात राहणा?्यांचीनुसती वाट लावलीयहा करोना का आलाका आला
त्याला इथून हाकलातो इथे का आलाआम्हाला बाहेर जायलात्याला इथून घालवायाने सुट्टी वाया जातेहा करोना का आलाका आला