मी सतत टीव्हीवर बातम्या बघतो आहे, मला खूप भीती वाटते आहे. मला वाटतंय की आता अख्ख्या जगात खूप माणसं मरणार. असं खरंच होईल का?- मयूर, कोल्हापूर
मयूर, तू तुझ्या मनातली भीती ऊर्जाला कळवलीस त्याबद्दल खूप खूप थँक यू मि त्रा. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणारा हा आजार झपाटय़ाने पसरणारा आहे; पण घाबरून जायचं कारण नाही. ऊर्जा तुम्हा मुलांना नेहमीच प्रामाणिकप णे उत्तरं देते त्यामुळे याबाबतही उगाच काहीबाही सांगणार नाही. हो, जगभर या आजाराने अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत हे खरं आहे. पण त्यामुळे आजार झालेले सगळेच मरतात असं मुळीचच नाहीये. आपल्या महाराष्ट्रात बघ, अनेक लोकं हॉस्पिटलमधून बरे होऊन घरी परत आले आहेत. कोरोनाची लक्षणं दिसणा-या अनेकांच्या चाचण्यांचेरिपोर्ट्स निगेटिव्ह आहेत. म्हणजे त्यांना लागण झालेली नाही. तुला भीती वाटणं अगदीच स्वाभाविक आहे. पण आपण योग्य ती काळजी घेतली तर या व्हायरसला हरवू शकतो. त्यामुळे तू अजिबात घाबरू नकोस. फक्त या दहा काही गोष्टी लक्षात ठेव. स्वत: तर करच; पण तुझ्या घरातल्या सगळ्यांना करायला सांग.
1) आईबाबा कुणी गरजेचं सामान आणायला बाहेर गेले तर त्यांना दुकानात सुरक्षित अंतर राखून रांगेत उभं राहायला सांग.2) आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी एकावेळी घरातली एकच व्यक्ती बाहेर पडायला हवी. आईबाबा, किंवा घरातल्या दोन मोठय़ांनी एकाच वेळी जायचं नाही.3) घराबाहेर पडताना मास्क घातला आहे ना चेक कर.
4) कुणालाही पैसे देताना लांबून द्यायचे.5) घराबाहेर असताना अनावश्यक वस्तूंना हात लावणं टाळलं पाहिजे.6) घराबाहेर तोंडाजवळ अजिबात हात न्यायचा नाही. स्पर्श करायचा नाही.7) पोलीस दादांनी अडवलं तर त्यांना घराबाहेर पडण्याचं कारण स्पष्टपणे सांगायचं.8) खरेदीसाठी एक वेगळी पिशवी आईबाबांना करायला सांग.9) बाहेरून आल्यावर साबणाने हातपाय स्वच्छ धुतले पाहिजेत.10) कुठलीही लक्षण दिसली तर लगेच डॉक्टरांना संपर्क करायला हवा.या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण मिळून केल्या तर आपण या व्हायरसला पळवून लावू शकतो. मग आता होणार ना शूर. भीती काढून टाक आणि लढायला सज्ज हो.